वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला
वर्धा: निवेदनात अशे म्हटले आहे की मां.पंतप्रधान नरेंद्र मोदी भारत देश तथा भारतीय सेना प्रमुख मां.राजनाथ सिंह यांनी नवीन योजना अमलात आणायचा विचार केला असून तो सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणां साठी घातक असून या योजनेतून फक्त नैराश्य च तरुणांना लाभणार आहे अश्या या योजनेला आपण रद्द करावे आणि कोरोना महामारी च्या आधी झालेल्या सैन्य भरती ची लेखी परीक्षा उर्वरित आहे ती घेऊन तरुणांना न्याय देण्यात यावा आणि आता पर्यंत जशी सैन्य भरती प्रक्रिया होत आली तशीच आता या पुढे ही घेण्यात यावी अग्निपथ तथा अग्णिविर ही योजना सफशेल निरुपयोगी असून यात तरुणांच्या मनात असलेलं देशप्रेम व आपल्या मातृभूमी करिता बलिदान देण्याची इच्छा कमी होईल तरी आपणास विनंती आहे की ही योजना रद्द करून भरती प्रक्रिया पुर्वरत होती तशीच ठेवावी व लवकरात लवकर सैन्य भरती घेण्यात यावी ही मागणी….
स्थानिक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या जवळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मां.मेहबूब भाई शेख यांच्या मार्गदर्शनात
राष्ट्रवादी युवक काँग्रेस वर्धा जिल्हाध्यक्ष संदीप कीटे,राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सूरज वैद्य यांच्या नेतृत्वात आंदोलनं घेऊन निषेध नोंदविण्यात आला तेव्हा उपस्थित असंख्य पदाधिकारी उपस्थित होते