लोकशाही दिनात 15 दिवसापूर्वी अर्ज सादर करावे उपजिल्हाधिकारी यांचे आवाहण 

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

वर्धा:जिल्हाधिकारी कार्यालयात प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात येते 4 जुलै ला होणाऱ्या लोकशाही दिनात नागरिकांना अर्ज करावयाचा असल्यास 15 दिवसापूर्वी विहित नमुन्यात दोन प्रतीत आवश्यक कागदपत्रासह अर्ज सादर करवा असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे यांनी केले आहे लोकशाही दिनात न्यायप्रविष्ट प्रकरणे राजस्व अपिल सेवाविषयक आस्थापना विषय बाबी तसेच विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्राच्या प्रती न जोडले अर्ज आणि अंतिम उत्तर दिलेले आहे किंवा देण्यात देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेल अर्ज तक्रार व निवेदन वैयक्तिक स्वरूपात नसल्यास अशा प्रकारचे अर्ज स्विकारण्यात येणार नाही असे निवासी उपजिल्हाधिकारी यांनी कळविले आहे