धम्म जागृती संघ तर्फे वर्षावास प्रबोधन अभियान

 

आषाढ पौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या वर्षावास निमित्त युवा सदस्यांचा धम्म जागृती संघ तयार करण्यात आला आहे . आद. धम्मप्रचारक सुरेश भिवगडे यांची अध्यक्ष म्हणून या युवा धम्म जागृती संघाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. तर महासचिवपदी सुरज मेहरे तर कोषाध्यक्ष सचिन मनवरे यांची निवड यात श्रीकृष्ण लोहकरे,सुनील कांबळे, आशिष अर्जुने, निखिल खडसे, स्वप्नील फुलोके, अनिकेत भगत, अमित भिवगडे, प्रकाश भिवगडे, विजय गजभिये, सारिपुत्र भगत रोशन सवाळे
तर मार्गदर्शक म्हणून *प्रा डॉ विजयाताई मुळे मॅडम*, मधुकर सवाळे
सपना भिवगडे, रवी सोपान भीमके, मनीष काळबांडे, हरीश कठाने आदी मान्यवर यात सहभाग दर्शविणार आहेत. वर्षावासामध्ये भिक्खू संघासोबत धम्मसाकच्छा, विविध विहारात धम्मप्रवचन आयोजन करणे, वंदना व सुत्त्तपठण, आदरणीय भिक्खू संघाला पाचारण करून धम्मदेशना पालिभाषा जन जागृती, बुद्ध विहाराच्या निर्मितीसाठी पुढाकार घेणे. फिरते धम्म वाचनालय बुद्ध धम्म संदेश अभियान धम्म सहल आदी उपक्रम राबविण्यात येईल अशी माहिती सुरेश भिवगडे यांनी दिली. सदस्य नोंदणी सुरू असून युवकांनी यामध्ये सहभागी व्हावे असेही आवाहन याप्रसंगी करण्यात आले.