सुसुंद्रा शेतीशिवारात वीज पडून दोन बैलांचा मृत्यू ,तर आजी नातवांचा जीव बचावला

कारंजा प्रतिनिधी // धीरज कसारे

कारंजा: तालुक्यातील सुसुंद्रा येथे आज दुपारी एक वाजताच्या सुमारास मनसुन्न करणारी घटना कानावर पडली आणि सगळ्यांनी गावालगत असलेल्या शेताकडे धाव घेतली, श्री,राजकुमार भाऊरावजी सोनुले यांच्या मालकीच्या शेतात शेत सर्व्ह नंबर ४ व ५५५ आराजी ००.४ हेक्टर असून शेतातील कोट्यात स्वतःची बैलजोडी बांधून होती अचानक आज एक वाजताच्या दरम्यान वादळीवाऱ्यास पावसाचे आगमन झाले व वीज पडून दोन्ही बैलांचा जागीच मृत्यू झाला यामध्ये शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे,काही दिवसाआधीच शेतकऱ्यांने एक लाख रुपये किंमतीची बैलजोडी विकत घेतलेली होती,ऐन शेतीच्या पेरणीच्या दिवसात अशाप्रकारे निसर्गाने घात केल्याने शेतकरी हवादिल झालेला आहे,त्यांची आई व मुलगा मात्र सुदैवाने बचावले, शेतकऱ्यांचे यामध्ये खूब मोठे नुकसान झालेले आहे, या शेतकऱ्यांचा शेती हा मुख्य व्यवसाय असून पूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह शेतीच्या आधारावर आहे यामध्ये असले नुकसान झाल्याने शेतकऱ्यांवर आता उपासमारीची वेळ आलेली आहे तरी शेतकऱ्याला शासनाकडून आर्थिक मदत मिळावी अशी अपेक्षा होत आहे.