कारंजा तालुका प्रतिनिधी // धिरज कसारे
वर्धा/कारंजा मान्सून दाखल झाला असून अजून पर्यंत मान्सूनपुर्व नाले व नाल्यांची कोणतीही सफाई झालेली दिसून येत नाही नारा गावातील मुख्य रस्त्यावरील तसेच गावातील विविध भागात वाहण्याच्या नाल्यांची सफाई केलेली नाही त्यामुळे पावसाळ्यात पाणी साचून अडचणी निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
नारा गावातील वाहणाऱ्या नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा व गाळ दिसून येत आहे नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई झाली नसल्यामुळे पाण्याला योग्य मार्ग मिळणार नाही.त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागेल .
पावसाळ्याला सुरुवात झाली असून नारा गावातील ग्रामपंचायत झोपी का ? हा प्रश्न नागरिकांना निर्माण होत आहे तसेच गावातील प्रथम नागरिक यांचे लक्ष कुठे आहे तसेच गावाकडे दुर्लक्ष होत असताना आपल्याला दिसून येत आहे या गोष्टी कडे प्रशासन यांनी लक्ष द्यावे