राहुल गांधी यांना (ईडी) ने दिलेल्या नोटिसबद्दल तालुका काँग्रेस कडून निषेध

 

कारंजा तालुका प्रतिनिधी // धीरज कसारे

 

कारंजा:- काँग्रेस नेते .राहुलजी गांधी यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत नोटीस देण्यात आलेल्या नोटिसा च्या विरोधात आज कारंजा तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कारंजा येथील तहसील कार्यालय तहसीलदार यांना निवेदन देऊन निषेध व्यक्त केला आहे , सदर नोटीसी संदर्भात मा.खा.श्री.राहुलजी गांधी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालय दिल्ली येथे दि. १३/०६/२०२२ रोजी चौकशीसाठी हजर राहिले होते, परंतु सक्तवसुली संचालनालय त्यांना मागील तीन दिवसापासून चोकाशीसाठी बोलावून त्रास देत असल्याचे काँग्रेस कडून बोलल्या जात आहे . सतत चौकशीसाठी बोलावणे व दिल्ली येथील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या प्रचंड दडपशाहीचाच एक भाग असल्याचे काँग्रेस कार्यकत्यांकडून निषेध व्यक्त केला आहे
टिकाराम घागरे, शशिभूषण कामडी, नितीन दर्यापूरकर, भगवान बुवाडे, संजय मसकी,विशाल इंगळे, राजेंद्र लाडके, टीकाराम चौधरी, , योगेश चौधरी, हेमंत बन्नगरे, गजानन भिलकर, रवी दूधकवरे, आनंद मिश्रा, कमलेश कठाणे, उमेश आमझिरे, सतीश इंगळे, मुकिंदा ढोबळे, प्रशांत बागडे, , सुभाष हिंगवे, संघपाल माणेराव, श्रीराम डोंगरे, सुमित बागडे, वैभव चाफले, रोशन वरठी, सुभाष हिंगवे, मनोज सिरसम, मनोज चरडे, रमेश सरोदे सह सर्व जेष्ठनेते, पदाधिकारी, युवक कार्यकर्ते उपस्थित होते.