मारहाण करुन जबरी चोरी करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा यांचे जाळ्यात

 

वर्धा जिल्हा प्रतिनिधी //उमंग शुक्ला

वर्धा: मुरलीधर विठोबाजी भोयर, रा. शिक्षक कॉलनी, कारंजा (घाडगे), जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन कारंजा (घाडगे) येथे येवुन रिपोर्ट दिला कि, दि. २९.०१.२०२२ चे २०.३० वा. दरम्यान नमुद फिर्यादी हे त्यांचे पत्नीसह घरी हजर असतांना कोणीतरी त्यांचे घराची बेल वाजवीली. त्यामुळे फिर्यादी यांनी दार उघडले असता एक इसम त्यांचे घरात आला व एका व्यक्तीचे नाव घेवुन पत्ता विचारला तसेच त्याचे पाठीमागुन दोन अनोळखी इसम घराचे आत आले. सदर अनोळखी इसमांनी यातील फिर्यादी व त्यांचे पत्नींना धारदार शस्त्र दाखवुन घरात बेडरुम मध्ये डांबुन ठेवले. तसेच फिर्यादी यांची अनोळखी इसमांसोबत झटापट झाल्याने फिर्यादी जखमी झाले. त्यानंतर सदर अनोळखी इसमांनी फिर्यादी व त्यांचे पत्नीचे अंगावरील तसेच घरातील ४८.५ ग्रॅम सोन्याचे दागीने किं. १,२१,२५० रु. चा माल व नगदी २०,००० रु. असे एकुण कि. १,४१,२५० रु. चा मुद्देमाल फिर्यादी यांना जखमी करुन जबरीने चोरी करुन निघुन गेले. अशा फिर्यादीचे तोंडी रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन कारंजा (घाडगे) अप.क्र. २१/२०२२ कलम ३९४, ४५२, ३४२, ५०६, ३४ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
सदर गुन्ह्याचे तपासादरम्यान गुप्त बातमीदार यांचेकडुन खात्रीशीर माहिती प्राप्त झाली कि, पोलीस स्टेशन आर्वी येथील अप.क्र. ४६३/२०२२ कलम ३०२, ३९७, ३६४, १२०(ब), २०१, ३४ भा.दं.वि. गुन्ह्यात अटक असलेले आरोपी १) अक्षय रमेश सपकाळ, २) मोहम्मद जाफर मोहम्मद यासीन, ३) विनोद दयाराम कुथे, ४) शेख शाहरुख शेख रऊफ सर्व रा. आर्वी यांचा वरील गुन्ह्यात सहभाग आहे. अशी माहिती प्राप्त झाल्याने सदर आरोपीतांचा कौशल्यपुर्ण रित्या विचारपूस करुन त्यांचेकडुन गुन्ह्यातील जबरीने चोरुन नेलेला संपूर्ण मुद्देमाल व दोन मोबाईल जप्त करुन वरील नमुद गुन्हा उघडकीस आणला.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. यशवंत सोळंके यांचे मार्गदर्शनात मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, आर्वी श्री. सुनिल साळुंखे यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस निरीक्षक श्री. संजय गायकवाड, पोउपनि बालाजी लालपालवाले, पोउपनि अमोल लगड, पोलीस अंमलदार निरंजन वरभे, गजानन लामसे, गिरीष कोरडे, रंजीत काकडे, अतुल भोयर, यशवंत गोल्हर, अभिजित वाघमारे, राजु जयसिंगपुरे, रितेश शर्मा, गोपाल बावणकर,प्रदीप वाघ, अमोल ढोबाळे, गणेश खेवले, गजानन दरणे सर्व नेमणुक स्था.गु.शा. वर्धा यांनी केली.