आर्वी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना सक्तवसुली संचालनालय (ईडी) मार्फत नोटीस देण्यात आलेल्या नोटिसा च्या विरोधात आज आर्वी तालुका काँग्रेस कमिटीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आर्वी येथील उपविभागीय अधिकारी हरिष धार्मीक यांना निवेदन देऊन निषेध करीत असुन तीव्र आंदोलन करीत आहे असे निवेदनातून व्यक्त करण्यात आले आहे सदर नोटीसी संदर्भात मा.खा.श्री.राहुल गांधी सक्तवसुली संचालनालय (ईडी) कार्यालय दिल्ली येथे दि. १३/०६/२०२२ रोजी चौकशीसाठी हजर राहिले होते, परंतु सक्तवसुली संचालनालय त्यांना मागील तीन दिवसापासून चौकाशीसाठी बोलावून त्रास देत असल्याचे काँग्रेस कडून बोलल्या जात आहे . सतत चौकशीसाठी बोलावणे व दिल्ली येथील अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटी कार्यालयाला पोलिसांकडून घेराव घालणे, वरिष्ठ नेत्यांना पोलिसांमार्फत मारहाण करणे, त्यांना डांबून ठेवणे हा केंद्रातील मोदी सरकारच्या प्रचंड दडपशाहीचाच एक भाग असल्याचे काँग्रेस कार्यकत्यांकडून निषेध व्यक्त केला आहे त्यावेळी अजिंक्य काळे, गजानन गावंडे, पंकज वाघमारे, किसना मिस्कन, विशाल साबळे, सागर डाफे,अक्षय सावंत,समिर चोरे,हितेश मेंद्रे,वजाहत खान, प्रशांत खरकाटे, धर्मेश शर्मा, निलेश महाजन, काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते