गडचिरोली, दि.१७ : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली या कार्यालयाच्या वतीने दिनांक २० व २१ जून २०२२ या कालावधीत ऑनलाईन रोजगार मेळावा आयोजित केलेला आहे.
करिता इच्छूक उमेदवारांनी कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता विभागाच्या
www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोटिलवर स्वत:ची नोंदणी (Employment Card) करून किंवा ज्यांनी यापूर्वी नांव नोंदणी केलेली असेल अशा सर्व बेरोजगार उमेदवारांनी आपल्या युजर आयडी व पासवर्ड लॉगीन करुन २० व २१ जून २०२२ रोजी वेबपोर्टलवर नोंद केलेल्या उद्योजकांच्या रिक्त पदांकरिता उद्योजकांनी नमूद केलेल्या शैक्षणिक पात्रतेनुसार अप्लाय करावे. उद्योजकांशी संपर्क साधून ऑनलाईन मुलाखत द्यावी व ऑनलाईन रोजगार मेळाव्याचा लाभ घ्यावा, असे सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार
उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, गडचिरोली यांनी कळविले आहे. अधिक माहिती करिता, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदशन केंद्र, गड़चिरोली या कार्यालयास संपर्क साधावा.