अवैध रित्या दारू विक्री करणाऱ्यावर कारवाही करुण बंदी घालन्याकरिता पोलिस अधिक्षकाना युवासेनेतर्फे निवेदन

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि // इशांक दहागावकर

 

एटापल्ली :तालुक्यातील अवैध दारू विक्री तात्काळ बंद करण्याबाबतचे मा. पोलीस अधीक्षक साहेब जिल्हा गडचिरोली यांना निवेदन देतांना शिवसेना युवासेना पदाधिकारी गडचिरोली जिल्हा

एटापल्ली तालुक्यात प्रचंड प्रमाणात अवैद्य दारू विक्री हे जोमाने चालू आहे. या दारुमुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे जीव हे धोक्यात आहे. तालुक्यातील तरुण पिढी हे दारू व्यसनात व्यस्त झाले आहेत त्याच्यामुळे त्यांचे भविष्य खराब होत चाललेले आहे. तरी या सर्व गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष देऊन एटापल्ली तालुक्यात अवैद्य दारू विक्री तात्काळ बंद करून तरुण पिढीच्या भविष्यासाठी कुठेतरी नवीन मार्ग शोधून या व्यसनातून मुक्त होतील आणि नवीन वाटचालीस सुरुवात करतील. जेणेकरून एटापल्ली तालुका हा दारूमुक्त होईल. यावेळी उपस्थित सुरेंद्र भाऊ चंदेल शिवसेना जिल्हाप्रमुख आरमोरी विधानसभा क्षेत्र, अविनाश भाऊ गेडाम शिवसेना उपजिल्हाप्रमुख आरमोरी विधानसभा, दीपक भाऊ बारसाकडे युवा षसेना जिल्हाप्रमुख गडचिरोली विधानसभा, सागर भाऊ भांडेकर युवासेना उपजिल्हाप्रमुख गडचिरोली विधानसभा,विकास प्रधान शहर प्रमुख वडसा, अरबाज भाई शेख युवा सेना शाखाप्रमुख, मनीष दुर्गे शिवसेना तालुकाप्रमुख एटापल्ली, दल्लु पुसली शिवसेना उपतालुका प्रमुख एटापल्ली, दीपक दत्ता तालुका समन्वयक एटापल्ली, सुमित खन्ना युवासेना शहरप्रमुख एटापल्ली, नेहाल कुंभारे उपशहर प्रमुख, हर्षद शेख तसेच सर्व शिवसेना युवासेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.