रात्र दरम्यान चाकुचा धाक दाखवुन लुटमार करणारे व्दिसदस्यीय टोळीला वर्धा शहर पोलीसांनी केले गजाआड गुन्हे शोध पथकाची कार्यवाही

 

 

जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला

अनिकेत प्रमोदराव पवार रा. यशवंत कॉलनी वर्धा हे इंजीनियर असुन कंपनीत पुण्याला जॉब करीत असतात सध्दया त्यांचे वर्क फॉर्म होम सुरू असल्याने ते घरूनच काम करीत आहे दिनांक 11/06/2022 चे रात्री 00 / 10 वा. दरम्यान जेवण करून सिव्हील लाईन रोडवरील स्वीमींग पुलाजवळ आपल्या भावी पत्नी सोबत फोन वर बोलत असताना दोन अनोळखी इसम मोपेड गाडीने आले व पवनार रस्त्या बाबत विचारपुस करण्याचा बहाणा करून गाडीचे खाली उतरून चाकुचा धाक दाखवुन खिसे तपासुन त्यांचे जवळ असलेला ONE Plass 8 T कंपनीचा मोबाईल किंमत 20,000/- रू. जबरीने काढून घेतला व धमकि देवुन निघुन गेले घाबरेले अनिकेत पवार हे सकाळी पोलिस स्टेशनला पोहचुन त्यांनी घटनेची तक्रार पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे नोंदविल्याने पोलिस स्टेशनला गुन्हा नोंद करण्यात आला

पोलिस स्टेशन वर्धा शहर येथे स.पो.नि. गणेश बैरागी सा. व गुन्हे शोध पथकाचे पो.हवा. संजय पंचभाई व त्यांचे पथकाने गुप्त बातमीदार यांचे कडुन प्राप्त झालेल्या माहीती वरून 1. रीतेश गजानन जाधव वय 20 वर्षे 2. अजीज शेख शाहिद शेख वय 26 वर्षे दोन्ही रा. आनंद नगर तारफैल वर्धा यांना ताब्यात घेत गुन्हयात जबरीने चोरी केलेला ONE Plass 8T कंपनीचा मोबाईल किंमत 20,000/- रू. व गुन्हयात वापरलेली अॅक्टीवा गाडी क्रमांक एम.एच. 32 ए.डी. 9794 किंमत 30,000/- गुन्हयात वापरलेला चायनिज चाकु असा एकुण जु.कि. 50,500/- रू. चा मुद्येमाल दोन्ही आरोपी कडुन जप्त करून अल्पावधीतच गुन्हा उघडकिस आणला.

सदरची कार्यवाही मा. प्रशांत होळकर सा. अप्पर पोलीस अधीक्षक यशवंत सोळकि सा. उप विभागीय पोलीस अधीकारी पियुश जगताप साहेब यांचे मार्गदर्शनात पोलीस निरीक्षक सत्यवीर बंडीवार यांचे निर्देशानुसार स.पो.नि. गणेश बैरागी, पो.उप.निरीक्षक प्रविण पाटील, पो.स्टे.च्या गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार संजय पंचभाई सुनिल मेंढे, शाम सलामे, आकाश बांगडे, यांनी केली.