पहिल्यांदा २०१७ ते २०२१ पर्यंतचा चा हिशोब द्या त्यानंतर २०२२ चे पैसे मागा धर्मेंद्र राऊत यांनी घेतली कणखर भूमिका

 

जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला

वर्धा:जिल्हा परिषद ने काढलेल्या नवीन परिपत्रकानुसार सर्व गटविकास अधिकाऱ्यांनी ग्रामपंचायतीला चालू वर्षाचा आपले सरकार सेवा (CSC)केंद्राचे सर्व रक्कम भरण्याची निर्देश दिले आहे.मात्र जिल्हा परिषदने अद्यापही २०१७ पासून चा ते आजपर्यंत कुठल्याही प्रकारचा आपले सरकार केंद्राचा (CSC) हिशेब ग्रामपंचायतला दिलेला नाही. त्यामुळे आधी तो हिशोब द्यावा त्यानंतरच आम्ही चालू वर्षाचे पैसे आपणाकडे देऊ अशा आशयाचे निवेदन वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी जिल्हा परिषद मुख्य कार्यपालन अधिकारी जि.प.वर्धा यांना सादर केले आहे.
सन २०१७ पासून प्रत्येक ग्रामपंचायत मध्ये आपले सरकार सेवा केंद्र (CSC) चालू आहे. तेव्हाच्या निर्देशानुसार मोठ्या प्रमाणात आपले सरकार केंद्र आला सोयीसुविधा पुरवण्याचे मान्य केले होते व सोबतच दरवर्षी या सर्व केंद्रांचा हिशेब ग्रामपंचायतला देणे बंधनकारक होते. मात्र तब्बल पाच वर्ष उलटून गेले असताना सुद्धा अद्यापही या एकाही वर्षाचा हिशेब ग्रामपंचायतला दिलेला नाही. त्याउलट ग्रामपंचायत कडून दरवर्षी पाहिजे तेवढी रक्कम घेतल्या जाते हे कुठेतरी अन्यायकारक असल्याची भावना आज ग्रामपंचायत स्तरावर प्रत्येकाला वाटत आहे. त्यामुळे गत पाच वर्षातील हिशेब सादर करावा त्यानंतरच चालू वर्षाचे पैसे ग्रामपंचायतीला मागावे अशी कणखर भूमिका दिलेल्या निवेदनात वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा. धर्मेंद्र राऊत यांनी घेतली आहे.
सोबतच त्यांनी वर्धा जिल्ह्यातील सर्व सरपंच, उपसरपंच यांना आव्हान केले आहे की जोपर्यंत जिल्हा परिषद गत पाच वर्षातील आपल्या स्तरावर ग्रामपंचायतला हिशेब देत नाही तोपर्यंत आपण आपले सरकार सेवा केंद्राच्या कोणत्याही प्रकारच्या रकमा जिल्हा परिषद ला अदा करु नये नाहीतर आपण आंदोलनाचा मार्ग अवलंबवू असे वर्धा जिल्हा सरपंच संघटनेचे अध्यक्ष प्रा.धर्मेंद्र राऊत यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.