जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला
वर्धा: इंदिरा मार्केट पोस्ट ऑफिस शाखा( प्रभाग क्रमांक १०(९),धंतोली चौक,पावडे नर्सिंग होम चौक येथिल पोस्ट ऑफीस शाखेतील तांत्रिक अडचणी व ग्राहकांना होणार्या त्रासा बद्द्ल मा.अधिक्षक डाकघर वर्धा विभाग, वर्धा याना वर्धा शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी तर्फे निवेदन
प्रभाग क्रमांक १०(९) , धंतोली चौक, पावडे नर्सिंग होम व आजुबाजुच्या परिसरातल्या लोकांना होणार्या त्रासा बद्द्ल मा.अधिक्षक डाकघर वर्धा विभाग वर्धा यांना मा.श्री. सुधिरभाऊ पांगुळ शहर अध्यक्ष वर्धा कॉंग्रेस कमिटी वर्धा यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देण्यात आले तत्पुर्वी सकाळी सदर शाखेस भेट दिली आसता
या शाखेत इंटरनेट सेवा, ट्रानजेक्सन सेवा, ही सुरळित चालत नाही व ग्राहकांना तासनतास ताट्कळ्त उभे राहावे लागते.आणि वृध्दांना ऑफिस वर असल्या कारणाने चडण्यास व उतरताना नाहक त्रास सहन करावा लागत आहे असे निदर्शनास आले यावेळी प्रभाग क्रमांक १०(९) येथिल रहिवासी व परिसरातिल लोकानी वर्धा शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटीकडे मागणी केली.याचीच तात्काळ दखल घेत हा होणारा त्रास लवकरात लवकर दुर करण्यासाठी डाकघर अधिक्षक वर्धा यांच्याशि चर्चा केली व ही बाब लक्षात आणुन दिली यावेळी मा.अधिक्षक डाकघर वर्धा यांनी वर्धा शहर जिल्हा कॉंग्रेस कमिटी यांना अश्वस्त केले.व लवकर हा प्रश्न मार्गी लावण्याची हमी दिली.
यावेळी प्रामुख्याने श्री. अविनाश सेलुकर जिल्हा संघटक,श्री.विजुभाऊ नरांजे जिल्हा सचिव, श्री. नंदकुमार कांबळे जिल्हा जनसम्पर्क- प्रसिद्धि प्रमूख, श्री. अरविंद गजभिये राहूल गांधी विचारमंच अध्यक्ष पुर्व विदर्भ, श्री.नदीम भाई, श्री.नकूल जुमडे शहर सहसचिव, श्री. अजिंक्य मेघे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्तित होते.