राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थापना दिवस आर्वीत साजरा

 

 

आर्वी: संपर्क प्रमुख सुबोध मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष सुनील राऊत, जिल्हा निरीक्षक राजाभाऊ टाकसाळे, म प्र सं अभिजित फाळके पाटील याच्या निर्देशानुसार दिनांक 10/06/2022 रोज शुक्रवार ला आर्वी येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष दिलीप पोटफोडे यांच्या नेतृत्वात त्यांच्या जनता नगर येथील निवास स्थानी छत्रपती शिवाजी महाराज डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून हारार्पण करण्यात आले त्या नन्तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा ध्वज फडकवून कार्यकर्त्यांनी सलामी देत स्थापना दिनी पक्षाची पाळमुळ अधिकाधिक घट्ट करण्याचा संकल्प घेतला दिलीप पोटफोडे यांनी मार्गदर्शन करताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची rराज्यात सत्ता असून महत्वाचे खाते पक्षाकडे असून सत्तेच्या मार्गातुन शेवटचा घटक कसा मजबूत होईल त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सर्वांनी जनसामान्याच्या वेदना समजून त्यांच्यासाठी काम कराव व कामातून पक्ष घरा घरात पोहचवावा असं आव्हान यावेळी केल तसेच शहर अध्यक्ष संजय देशमुख यांनी मार्गदर्शन करताना पक्ष बांधणी बूथ बांधणी तरुण, जेष्ठ, युवती व महिला च संघटन.अधिक.मजबूत करण्याच्या दिशेने काम करण्यासाठी मार्गदर्शन केल तसेच रेखा वानखेडे शुभांगी कलोडे माधुरी सपकाळ प्रमिला हत्तीमारे भारती पोटफोडे यांनी स्थानिक स्वराज संस्था मध्ये सुद्धा पक्षाचा झेंडा फडकवन्यासाठी महिला टीम सज्ज असल्याचे सूतोवाच यावेळी केले महिला शहर अध्यक्षा सौ शोभा कानफाडे यांनी पक्ष मजबूती च्या दिशेने सर करत असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला येणाऱ्या दिवस हे सोनेरी असून कार्यकर्त्यांनी आज वाहून घेतल्यास याचा मोठा फायदा आपल्या शहराला होईल असे सांगितले यावेळी प्रामुख्यानेशहर उपाध्यक्ष संजय चिंधेकर, अरुण धानोरकर, शंकर हत्तीमारे, सुरेंद्र वाटकर, बादल काळे, कमलेश चिंधेकर, अमोल बेलेकर, सिद्धू खान, इस्राएल शाह, अझहर खान, स्वाती कोवे, शिला कंगाले, ज्योती हत्तीमारे, प्रतिभा हत्तीमारे, प्रतिभा पोटफोडे व बालगोपाल उपस्थित होते