फार्महाऊसचे गोडाऊन मधील धान्य माल चोरी करणारे चोरटे गिरड पोलीसांचे जाळ्यात

 

जिल्हा प्रतिनिधि //उमंग शुक्ला

दिनांक ०६.०६.२०२२ रोजी फिर्यादी नामे श्री ईन्द्रजीत कुशाबराव मुंगल, रा. हिवरा, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांनी पोलीस स्टेशन गिरड येथे तक्रार दिली कि, फिर्यादी यांच्या हिवरा शिवारातील शेतात असलेल्या फार्महाऊसचे गोडाऊन मध्ये ठेवून असलेले सोयाबिन, चना व तुर धान्याचे एकुण २८ कट्टे प्रत्येकी ६० किलो वजनाचे असा एकुण जु.कि. ७४,०००/- रू. चा माल कोणीतरी अज्ञात चोरट्यांनी दिनांक २५.०५.२०२२ ते दि. ०४.०६.२०२२ दरम्यान फार्महा ऊस मधील गोडा ऊनच्या दाराचे कुलुप खोलुन गोडाऊनचे आत प्रवेश करून चोरून नेला. अशा फिर्यादीचे तक्रारीवरून पोलीस स्टेशन गिरड येथे अप. क्र. १३६/२०२२ कलम ३८०, ४५४, ४५७ भा.दं.वि. अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला.

सदर गुन्हयाची तात्काळ दखल घेत मुखबीरकडुन मिळालेल्या खात्रीशीर गोपनिय माहितीवरून आरोपी नामे क्र. १) नितेश नारायण ढाकणे, वय २९ वर्ष, २) अमोल कवडुजी सराटे, वय २६ वर्ष, ३) पांडुरंग उर्फ कवडु तुकाराम सोनवणे, वय ३२ वर्ष, सर्व रा. हिवरा, ता. समुद्रपूर, जि. वर्धा यांना ताब्यात घेवुन त्यांना गुन्ह्यासंबंधाने विचारपूस केली असता त्यांनी संगणमताने गुन्हा केल्याची कबुली दिल्याने त्यांचे ताब्यातुन गुन्ह्यातील चोरीस गेलेला माल १) सोयाबिन धान्याचे ६० किलो वजनाचे एकुण १२ कट्टे प्रत्येकी २५००/ रु. प्रमाणे एकुण ३०,०००/- रू., २) चना धान्याचे ६० किलो वजनाचे एकुण १४ कट्टे प्रत्येकी २५००/रू. प्रमाणे ३५,०००/- रू., ३) तुर धान्याचे ६० किलो वजनाचे एकुण २ कट्टे प्रत्येकी ४५०० रू. प्रमाणे एकुण ९०००/- रू. चा माल असा एकूण ७४,०००/- रू. चा माल व गुन्ह्या करणे करिता वापरलेले वाहन १) एक टाटा एस मालवाहु क्र. एम.एच.- ३२/ऐ.जे.-२९८९ किंमत ५,००,०००/- रू., २) एक हिरो कंपनीची गॅल्मर मोटर सायकल क्र. एम.एच.- ३२/ऐ.बी.-८४०९ किंमत ३०,०००/- रू. असा एकुण जुमला किंमत ६,०३,०००/- रु. चा मला हस्तगत करुन गुन्हा उघडकिस आणला.

सदरची कारवाई मा. पोलीस अ धीक्षक श्री. प्रशांत होळकर, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. , यशवंत सोळंके, मा. उपविभागीय पोलीस अधिकारी, हिंगणघाट श्री. दिनेश कदम यांचे मार्गदर्शनात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. सुनिल दहिभाते ठाणेदार पो.स्टे. गिरड यांचे निर्देशाप्रमाणे पोलीस अमंलदार अनुप टपाले, असिम शेख नेमणुक पोलीस स्टेशन गिरड यांनी केली.