दुचकिवरुन पडूंन आरोग्य सेवीकेचा मृत्यु

 

#Khabardarmaharashtra online news, crime social, education, political, corona#

 

अकोला बाजार : प्राथमिक उपकेंद्रातील आपले कर्तव्य पार पाडून सहकारी कर्मचाऱ्यासह दुचाकीवर बसून घरी परत जात असताना सावरगड फाट्याजवळ दुचाकीवरून खाली रस्त्यावर पडल्याने झालेल्या अपघतात आरोग्य सेविकेचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी दिनांक 9-जून 2022 रोजी दुपारी 2:30 वाजता घडली.
दर्शना रमेश सहारे वय (41) वर्ष रा. यवतमाळ असे मृतक आरोग्य सेविकेचे नाव आहे. अकोला बाजार प्राथमिक आरोग्य केंद्रातर्गत लोणी (घाटाणा ) येथील आरोग्य उपकेंद्रात मागील 12 वर्षांपासून आरोग्य सेविका म्हणून त्या कार्यरत होत्या. अकोला बाजार आरोग्य केंद्रातील मिटिंग आटोपून त्या एका सहकारी डॉक्टरांच्या दुचाकीवर बसून यवतमाळ येथे घरी परत जात होत्या. सावरगड (हेटी ) फाट्याजवळ त्या अचानक दुचाकीवरून पडल्या. त्यांच्या डोक्याला मोठी दुखापत झाली. अकोला बाजार येथील शैलेश डाखोरे व काही शिक्षकांनी त्वरित मदत करून यवतमाळ शासकीय रुग्णालयात दाखल केले. परंतु दर्शना सहारे यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.
त्यांचे मागे पती , दोन मुली व मोठा आप्त परिवार आहे.