जिल्हा परिषद, चंद्रपूर येथे “शिवस्वराज्य दिन” उत्साहात संपन्न

 

चंद्रपुर: छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिन (६ जून) हा शिवस्वराज्य दिन म्हणून ग्राम विकास विभागामार्फत मागील वर्षापासून साजरा केला जातो, यंदाच्या वर्षीसुद्धा जिल्हा परिषदेत शिवस्वराज्य दिवस हा मोठ्या उत्साहात संपन्न झाला, जिल्हा परिषदेच्या मुख्य आवारात सोमवार रोजी सकाळी नऊ वाजता शिवस्वराज्य दिनानिमित्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक डॉ. मित्ताली सेठी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला अभिवादन करून भगव्या स्वराज्यध्वज गुढीचे पूजन केले व ही स्वराज्यध्वजाची गुढी जिल्हा परिषदेच्या प्रांगणात उभारण्यात आली.
याप्रसंगी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा गौरकार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (साप्रवि) श्याम वाखर्डे, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अशोक मातकर, ,, शिक्षणाधिकारी (प्राथमिक) दीपेंद्र लोखंडे, कार्यकारी अभियंता (बांधकाम), शंभरकर यांच्यासह अधिकारी व कर्मचारी वृंद उपस्थित होते.