प्रतिनिधि // उमंग शुक्ला
आर्वी: दिनांक 04-06-2022 सायंकाळी चार वाजताच्या दरम्यान आसोले नगर येथून देवांश निलेश घोडमारे वय (14) व युगंदर धर्मपाल मानकर वय (14) हे दोघेही जिवलग मित्र असून घरून खेळायला जातो असे सांगून गेले मात्र उशिरापर्यंत घरी न आल्यामुळे असोले नगर व साई नगर परिसरात चांगलीच खळबळ उडाली तसेच दोन्ही मुलाच्या आई-वडिलांनी सर्व मित्रांकडे चौकशी केली असता कुठेच नसल्याचे समजताच घोडमारे व मानकर यांनी या घटनेची तक्रार आर्वी पोलीस स्टेशन येथे दिली.
तसेच आर्वी पोलिसांनी भादवि 364 गुन्हा नोंद करून भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात तपास सुरू केला व त्यांच्या मोबाईलचे लोकेशन तपासले असता मोबाईल चे लोकेशन माठोडा-बेनोडा परिसर दाखवत असल्याने सर्व परिसरात पहिले परंतु कुठेच दिसून आले नाही. तसेच दिनांक 05-06-2022 रोजी सकाळी नऊ वाजताच्या दरम्यान माटोडा – बेनोडा रोडवर काही अंतरावर पप्पू गुल्हाने यांच्या शेतातल्या विहिरीत एक ऊबड्या अवस्थेत मृतदेह दिसून आल्याने सर्व परिसरात खळबळ उडाली व या घटनेची माहिती आर्वी पोलिसांना देण्यात आली तसेच आर्वी पोलिसांनी घटनास्थळावर धाव घेऊन पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करून मंगेश मेश्राम, वामन डेहनकर यांनी विहिरीत उतरून सुरुवातीला एका मुलाला बाहेर काढले व दुसरा मृतदेह इलेक्ट्रिकच्या केबलला अडकला असल्याने बाहेर न आल्याने इलेक्ट्रिक केबल वर ओढताच मृतक दुसरा मुलगा दिसून आला व त्याला पण बाहेर काढण्यात आले. व तसेच शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय आर्वी येथे पाठवण्यात आले. तसेच पुढील तपास ठाणेदार भानुदास पिदुरकर यांच्या मार्गदर्शनात सहनिरीक्षक वंदना, सोनवणे, उपनिरीक्षक चंद्रकांत तावरे, व पोलिस स्टेशन करीत आहे पोहण्याच्या छंदात जिवलग मित्रांनी गमावला जीव
या दोन्ही मुलांनी अंगावरचे कपडे काढून विहिरीच्या बाजूला एका बॅगमध्ये ठेवलेले दिसून आले. व खिराडीला प्लास्टिकची दोरी बांधलेली होती. त्याच दोरीच्या मदतीने पोहण्याच्या उद्देशाने उतरले असावे असा एक अंदाज वर्तविला जात आहे