नांदपुर येथे पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांची जयंती निमित्त कार्यक्रम संपन्न

 

या कार्यक्रमाचे आयोजन नांदपुर येथील महिला व गावकरी
तर्फे करण्यात आला.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर
या “तत्वज्ञानी राणी” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाराणी राजमाता अहिल्याबाई होळकर यांची आज जयंती ..
माननीय सचिनभाऊ वैद्य यांनी मार्गदर्शनात सांगितले की अहिल्याबाई होळकर या पहिल्या स्त्री ज्यांनी स्त्रीयांची सेना बनवून नारी शक्तीचा परिचय जगाला करून दिला. एक अतिशय योग्य शासक व संघटक न्यायप्रियता, पराक्रमी योद्धा आणि सर्वश्रुत धनुर्धर या सर्व गोष्टींमध्ये पारंगत असणाऱ्या तसेच इतिहासाच्या काल पाटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या होळकर घराण्याच्या “तत्वज्ञानी राणी” म्हणून ओळखतात.
सचिनभाऊ वैद्य यांनी आणखी सांगितले की अहिल्याबाई होळकर या केवळ एक महान शासकच नव्हे तर अनेक युद्धांमध्ये विचारपूर्वक निर्णय घेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ मोनिका सुबोध गोंडसे यांनी केले तसेच प्रास्ताविक सौ.तृप्ती नितीनराव ढगे यांनी प्रास्ताविक मांडले तसेच राजमाता अहिल्याबाई होळकर यांच्या बद्दल
सौ.राणीताई गोंडसे_हेले यांनी माहिती दिली.
तसेच आभार प्रदर्शन काजल डाखोडे यांनी केले
अन्याय विरुद्ध आक्रमण करण्यास कधीही मागेपुढे पाहत नसत .
इतिहासाच्या कालपटावर स्त्री व्यक्तिमत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता अहिल्याबाई होळकर यांना जयंती निमित्त विनम्र अभिवादन.
यावेळी कार्यक्रमाला श्रीमती रंजना गोंडसे, लिला वैद्य,कोसल्या गोंडसे विमल डाखोडे , अनुराधा गोंडसे अर्चना डाखोडे, बेबी जुवारे, पंचफुला डाखोडे, रत्ना घुले,
मोनिका गोंडसे,राणी गोंडसे_हेले,
स्वाती गोंडसे, चंद्रकला आत्राम,
बेबी गोंडसे, प्रभा गोंडसे तृप्ती ढगे, चंद्रकला जुवारे, शारदा डाखोडे, पुष्पा जुवारे, नंदा डाखोडे, रीना जुवारे,पुनम डाखोडे, काजल डाखोडे तसेच सचिनभाऊ वैद्य, सुबोध गोंडसे
संकेत सुरेशराव थुल,
नितीन ढगे,अजय मुर्खे,तेजस मानेकर, सागर देशमुख, बाळाभाऊ काळे, दिलीप जुवारे, सुरज पखाले, धिरज रणगीरे, स्वप्नील जाधव, हर्षल गोंडसे,योगेश घुले
प्रामुख्याने उपस्थित होते
व नांदपुर ग्रामस्थ आवर्जून उपस्थित होते व जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.