माज़ी मंत्री सुधिरभाऊ याच्ये पटशिष्य पंचायत समिति सभापति वर कार्यवाही करा:- राजू झोडे पदाचा दुरूपयोग करणाऱ्या सभापतीला पदावरून हटवून कठोर कारवाई करण्याची वंचित बहुजन आघाडी ची मागणी  

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

मुल पंचायत समितीचे सभापती चंदु मारगोनवार यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत बेंबाळ ग्रामपंचायतचे सरपंच यांना सरपंच पदावरून हटविले तसेच ग्राम विकास अधिकारी बेंबाळ यांना धमकीवजा पत्र पाठवून दबाव आणण्याचा प्रयत्न केला. पदाचा गैरवापर करणाऱ्या पंचायत समिती सभापतीला तात्काळ पदावरून हटवून त्यांचेवर तात्काळ गुन्हा दाखल करण्यात यावा याकरिता वंचित बहुजन आघाडीचे विदर्भ समन्वयक राजू झोडे यांनी जिल्हाधिकारी यांचेकडे निवेदनाद्वारे मागणी केली.
बेंबाळ ग्रामपंचायतचे सर्व कामाचे बांधकाम मी सांगेन त्या ठेकेदाराला मिळाले पाहिजे. ज्या काही ई-निविदा ऑनलाइन केलेले आहेत त्यांना रद्द करून ते सर्व कामे मलाच मिळाले पाहिजे. जर तुम्ही माझे म्हणणे ऐकत नसेल तर मी तुमच्यावर कारवाई करेल अशा आशयाचे पत्र दिनांक ५/६/२०२१ ला ग्राम विकास अधिकारी यांना टपालाद्वारे पाठवले. दिनांक १८ /६/२०२१ ला ग्रामपंचायत सदस्यांना हाताशी घेऊन सरपंचावर अविश्वास ठराव पारित केला. सरपंच व ग्रामसेवक आपल्याला किंमत देत नाही, अशा भावनेतून सरपंच व ग्रामसेवक यांच्यावर दबाव तयार करून आलेल्या निधीच्या कामाचे ठेके स्वतःलाच मिळावे या आकसेपोटी आपल्या पदाचा गैरवापर करून धमकीवजा पत्र पाठविले.
ही बाब अत्यंत गंभीर असून शासकीय कामकाजात हस्तक्षेप करणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना धमकावणे, पदाचा दुरुपयोग करणे या बाबी अंतर्गत पंचायत समिती सभापती चंदू मारगोनवार यांना पदावरून तात्काळ हटवून यांच्यावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली.
आदरणीय सुधीर मुनगंटीवार यांच्या पक्षाचे व त्यांचे जवळचे कार्यकर्ते असल्याने प्रशासनावर दबाव आणण्याचा प्रयत्न केला तर वंचित बहुजन आघाडी आक्रमक भूमिका घेणार व पंचायत समिती मूल मध्ये घुसून गोंधळ घालणार तसेच तीव्र निदर्शने करणार असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते राजू झोडे यांनी शासन व प्रशासनाला निवेदनाद्वारे इशारा दिला.