कोरोना काळात अनेक पालकांना निर्माण झालेल्या आर्थीक समस्या लक्षात घेता ,विद्यार्थ्यांना द्याव्या लागणाऱ्या विविध शुल्कांमध्ये कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला

 

प्रतिनिधी // अंकुश पुरी

गडचिरोली : वाढत्या कोरोना प्रादुर्भावामुळे मागील दीड वर्षापासून विद्यार्थी महाविद्यालयामंध्ये प्रत्यक्ष शिक्षण घेण्याकरिता येवू शकले नाही. या काळात अनेक पालकांना निर्माण झालेल्या आर्थीक समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांना दयाव्या लागणाऱ्या विविध शुल्कांमध्ये कपात करण्याचा निर्णय विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे.
येत्या शैक्षणिक सत्र २०२१-२२ करीता इंद्रधनुष्य, आव्हान, अविष्कार, विद्यार्थी कल्याण निधी, विद्यार्थी वैद्यकीय मदत शुल्क, विद्यार्थी संघ शुल्क, वैद्यकीय तपासणी अर्ज शुल्क, आपत्ती व्यवस्थापन शुल्क १०० टक्के माफ करण्यात आले असून ग्रंथालय शुल्क, प्रयोगशाळा शुल्क व पर्यावरण शुल्क यामध्ये ५० टक्के फी सवलत देण्याचा निर्णय विद्यापीठाव्दारे घेण्यात आलेला आहे. सोबतच उन्हाळी २०२० परीक्षेकरीता सर्व नियमित विद्यार्थ्यांकरीता सरसकट १० टक्के फी कपात करण्याचा निर्णय सुध्दा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने घेतला आहे.
सदर निर्णयाचे सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी काटेकोरपणे पालन करून विद्यार्थ्यांना दिलासा द्याव असे आवाहन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरू डाॅ. श्रीराम कावळे यांनी केले आहे. याबाबत सर्व माहाविद्यालयांना परिपत्रकाव्दारे विद्यापीठाने कळविले आहे.