कोविड सेंटर बंद झाल्यावरही रवि शिंदे यांची रूग्ण सेवा सुरुच  कोरोनाबाधितांसाठी ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनची सुविधा

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

कोविड सेंटर तात्पुरत्या स्वरुपात बंद झाल्यावरही रवि शिंदे यांची कोरोनाबाधित रूग्णसेवा सुरुच आहे. स्व. श्रीनिवासराव शिंदे स्मृती प्रित्यर्थ रविंद्र शिंदे चैरीटेबल ट्रस्ट, भद्रावती तर्फे ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीन कोरोनाबाधित रुग्णांना दिल्या जात आहे. ‘मी सदैव आपल्या सोबत आहो’, हे ब्रीदवाक्य घेवुन रवि शिंदे यांचे आरोग्य क्षेत्रातील काम सुरु आहे.
स्थानिक सुमठाना येथील जनार्धन गजानन पेटकर या कोरोनाबाधित रुग्णास घरीच वापरण्याकरीता सदर ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनची सुविधा करुन देण्यात आलेली आहे.
परीसरातील होम आयसोलेट कोरोनाबाधित रुग्णांना ऑक्सीजन कॉन्सनट्रेटर मशीनची आवश्यकता असल्यास संपर्क साधण्याचे आवाहन रवि शिंदे यांनी केले आहे.