प्रतिनिधी//अंकुश पुरी
देसाईगंज // शहराच्या स्वच्छतेचा 2 करोड 13 लक्ष मध्ये ठेकेदाराला ठेका दिला असुन. मागील काही दिवसांपासून वर्तमानपत्रातून या वर जाहिरात व विकास नावे निधी याची माहिती वृत्तपत्रातुन खडणं केली सतत प्रशासनाने त्यास दुजोरा दिला मग समस्या जैसे थे असल्याने जिल्हाधिकारी गडचिरोली यांना भेटून ही समस्या मार्गी लावण्याचे निवेदन पिंकु बावणे यांनी दिल. त्यावर जिल्हाअधिकारी यांनी दिलेले आश्वासन हवेतच विरले असे जाणवत असून
तरी सुद्धा ठेकेदार आणि नगर प्रशासन जागे होण्यास तयार नाही. माझी नायब तहसीलदार स्वतः घरासमोरील नाली स्वच्छ करतांना दिसून आले. त्यांनी वारंवार नगरपरिषद प्रशासनाला माहिती दिली असता त्यांनी या कडे दुर्लक्ष केले. एक प्रशासकीय अधिकाऱ्यांना असे काम करावे लागेल तर सामान्य माणसाच्या समस्यांचे निवारण कसे करणार? हा प्रश्न जनसेवक व प्रशासन यातून दिसून येत आहे. मग स्वतः नाली स्वच्छ करावयाची असेल तर मग ठेकेदारांना ठेके देवून सामान्य जनतेच्या पैस्याची उधळण करून काय साध्य होणार. शहरात रहदारी वाढल्या मुळे साथीचे रोग पसरण्याची शक्यता यातून नाकारता येणार नाही. पावसाळ्याचे दिवस सुरू असुन सर्वत्र पाणी, कचरा कुजलेला पडून असल्याने लोकांना दुर्गंधी ला सोबत घेऊन जीवन जगावे लागते आहे.शहर विकास समृद्धी पासून उदासीन असेल तर ग्राम समृद्धीचे दिवस कसे असणार हे या शहर समस्यावरून प्रशासन कधी जागे होणार या कळे देसाईगंज वाशीयांची नजर लागली आहे.