नागपूर विभागाचे पदवीधर आमदार मा. अभिजित वंजारी यांचे सोबत त्रुटी मधील शाळा बाबत बैठक संपन्न  

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

आज नागपूर विभागाचे पदवीधर आमदार मा. अभिजित वंजारी यांचे सोबत दुपार नंतर परत त्यांचे कार्यालयात त्रुटी मधील शाळा बाबत बैठक झाली, त्यावेळी आमदार अभिजित वंजारी यांनी भ्रमाणध्वनिवरून काँग्रेस प्रदेश्याध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांना याविषयी सविस्तर माहिती दिली व आपण सोमवार ला मुंबई ला उपस्थित राहून हा विषय मार्गी लावण्याची विनंती केली, तसेच मंत्रालयातील सहसचिव मा. काझी साहेब, सहा. कक्षधिकारी आवाढ साहेब यांचे सोबत त्रुटी च्या यादी बाबत भ्रमणध्वनीवरून माहिती घेतली.
आज आमदार वंजारी साहेब यांनी इतर सर्व कार्यक्रम बाजूला ठेऊन त्रुटीतील अन्यायग्रस्त शिक्षकांसाठी देऊन प्रश्न मार्गी लावण्यासाठी मंत्रालय स्तरावर पाठपुरावा केला तसेच सोमवारी स्वतः मंत्रालयात येऊन पाठपुरावा करणार असल्यामुळे आज उपस्थित शिक्षकानी समाधान व्यक्त केले
यावेळी प्राचार्य नरेंद्र बोबडे, प्रा. अजय अलगमकर, स्वप्नील पिसे, माजी प्राचार्य रमेशराव पायपरे, प्राचार्य उमेश पंधरे यांचे सह चंद्रपूर , गडचिरोली, नागपूर येथील शिक्षक प्राध्यापक मोठ्या संख्येने उपस्थित होते.