प्रतिनिधी / / दीक्षा झाडे
भामरागड ला लागून असलेल्या पार्लाकोटा नदीवर ठेंगण्या पुलामुळे जगापासून संपर्क तूटत होता. त्यामुळे उंच पुलाची मागणी फार वर्षांपासून होत होती. सदर पूल मंजूर होऊन बांधकामास सुरुवात झाले. परंतु भामरागड मधील रस्त्याच्या दोन्ही बाजूला व्यापारी दुकानें आहेत. त्यापैकी एका बाजूतील सर्वच्या सर्व 120 व्यापारी दुकानावरून पुलाचा रस्ता जात असल्यामुळे फार मोठा आर्थिक नुकसान होत आहे. या पुलाला विरोध नसून व्यापारीवर्गाचा आर्थिक नुकसान भरपाई करून स्वातंत्र्य जमीन उपलब्ध करून एकाच ठिकाणी दुकानाचे गाळे बांधून पुनर्वसन करून देण्याची मागणी करण्यात येत आहे. या बाबत अनेक नेत्यांना निवेदन देऊनही काही उपयोग होत नसल्याचे बघून शिवसेने स्वतः त्यांची अडचण जाणून घेण्यात आले असता गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री मा. एकनाथजी शिंदे साहेब यांच्याशी चर्चा करून आम्हची समस्या सोडवा म्हणून मा. किशोरी पोतदार शिवसेना गडचिरोली जिल्हा संपर्क प्रमुख भामरागड तालुक्याच्या दौऱ्यावर आले असता त्यांच्याकडे निवेदन देण्यात आले. यावेळी शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडापे, रयाजभाई शेख अहेरी जिल्हाप्रमुख, विधानसभा प्रमुख अरुणभाऊ धुर्वे, संघटक बिरजूभाऊ गेडाम, तालुकाप्रमुख खुशाल मडावी, भामरागड संघटक चंदू बेझलवार, अहेरी उपतालुका प्रमुख प्रफुल येरणे तथा भामरागड येथील मोठया संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.