बामणी ग्रामपंचायतीमधे शासकिय निधिची अफरातफर?- श्री. मोरेश्वर उदिसे

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

बल्लारपूर पंचायत समितीच्या कार्यकक्षेत येत असलेल्या बामणी ग्रामपंचायतीने नियोजन शुन्यतेचा कळस गाठला असुन बांधकाम अभियन्ता व पदाधिकारी यांच्या गलथान कारभारामुळे एकाच इमारतीचे दोन ठिकाणी बांधकाम करन्याची वेळ आली आहे. यामुळे शासकिय निधिची अफरातफर होत असून चौकशी व कारवाईची मागणी येथील माजी ग्रामपंचायत उपसरपंच श्री. मोरेश्वर उदिसे रा. बामणी जिल्हा: चंद्रपुर यांनी मान. जिल्हाधिकारी,चंद्रपुर यांना निवेदन द्वारा केली आहे.