राज्यातील अल्पसंख्यांक शाळेत सेवाज्येष्ठतेनुसार मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे.- श्री. विवेक आंबेकर  घटनेनुसार आरक्षणाचा लाभ मिळावा.  विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना लागू करावी.

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

राज्यातील अल्पसंख्याक शाळा करिता MEPS1977 या नियमानुसार संस्थाचालक सेवाज्येष्ठता डावलून अल्पसंख्यक शाळेत आपल्या मर्जीतला मुख्याध्यापक नियुक्त करीत असतात, त्यामुळे ज्येष्ठ शिक्षकांवर अन्याय होत आहे.
अल्पसंख्य शाळेत संस्थाचालक आपल्या मर्जीतील मुख्याध्यापक नियुक्त करत असल्यामुळे , संस्थाचालक व मुख्याध्यापक मिळवून अन्य शिक्षकांनवर अन्याय करण्याचा प्रकार दिवसेंदिवस वाढत आहे.

ज्येष्ठ शिक्षकांना यामुळे हीन भावनेला समोरे जावे लागत आहे , हे घटनेच्या नैसर्गिक नियमाप्रमाणे नसून देशात या प्रकारचा कायदा अन्यायकारक आहे.

या कायद्यामध्ये आपण तातडीने बदल करून सेवाज्येष्ठतेनुसार अल्पसंख्यक शाळेतही मुख्याध्यापकाचे पद भरण्यात यावे, याचा अध्यादेश काढावा.
तसेच या अल्पसंख्याक शाळेत आरक्षणानुसार शिक्षक कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली जात नसून आरक्षणाचा लाभ समाजातील इतर जनतेला मिळत नाही .
यामुळे इथेही रोस्टर पद्धत लागू करून आरक्षणाचा लाभ देशात तळागाळातील गोरगरीब , मागासवर्गीय आर्थिक दुर्बल घटकातील बेरोजगार युवकांना त्यांच्या हक्कानुसार रोजगार उपलब्ध करून द्यावा.
तसेच अल्पसंख्यक शाळेत विद्यार्थ्यांसाठी राजश्री शाहू महाराज शुल्क प्रतिपूर्ती योजना तातडीने लागू करून त्यांचे आर्थिक शोषण थांबवावे.
शिक्षक कर्मचाऱ्यांना MEPS1981 नुसार नेहमी पूर्ण वेतन देण्यासाठी अल्पसंख्यक शाळेला ताकीद द्यावी, अन्यथा या शाळेच्या संस्थांची धर्मदाय आयुक तर्फे चौकशी करून एफआयआर दाखल करावा. असे निवेदन माननीय मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, माननीय शालेय शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य,
माननीय श्री विजयभाऊ वडेट्टीवार पालकमंत्री चंद्रपूर जिल्हा, माननीय शिक्षक आमदार श्री. नागोजी गाणार नागपूर विभाग, माननीय आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांना
श्री. विवेक आंबेकर
विभाग प्रमुख महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद कान्वेंट शाळा प्रमुख व अध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक-पालक एकता मंच यांनी दिले आहे.