बचत गटाच्या महिला बनतील कोविड योध्दा : रवि शिंदे बचत गटांना कर्ज वितरण कार्यक्रम संपन्न

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

गावागावात बचत गट आहेत, या बचत गटाच्या महिला कोविड योध्दा बणून काम करतील व आपआपले गाव कोरोनामुक्त ठेवतील असे प्रतिपादन बचत गट महिलांच्या साक्षीने दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., चंद्रपूर चे माजी अध्यक्ष तथा विदयमान संचालक रवि शिंदे यांनी केले. वरोरा तालुक्यातील टेमुर्डा जवळच्या केम येथील प्रगती महिला बचत गटाला दि. चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सह. बँक मर्या., शाखा टेमुर्डाच्या माध्यमातून अध्यक्ष संतोषसिंग रावत व संचालक मंडळाच्या निर्णयानुसार संचालक रवि शिंदे यांच्या हस्ते कर्ज वितरण करण्यात आले. यावेळी महिलांना रवि शिंदे यांच्या वतीने मास्क व सॅनिटायजर वाटप करण्यात आले.
आयोजित कार्यक्रमात शाखाधिकारी कोहिनूर भोयर, निरीक्षक दिपक चिडे, रामदास वांढरे, योगेश पचारे, पोर्णिमा वावरे, बंडू डोंगरे, प्रगती महिला बचत गटाच्या अध्यक्षा स्वाती ढोके, सचिव प्रतिभा राऊत, सदस्य संगीता खिरटकर, प्रीती ढोके, स्वाती पावडे, शशीकला पावडे, बेबीताई राऊत, दुर्गा ढोके, अल्काताई खिरटकर, हीराबाई ढोके, सामाजिक कार्यकर्ते वसंता मानकर, दत्ताभाऊ बोरकर, सुरज निब्रड, अरविंद बोडणे, कमलाकर पाकमोडे, श्रीकृष्ण आसुटकर, ईश्वर पावडे आदी उपस्थित होते.