राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे तहसील कार्यालयासमोर निदर्शने आंदोलन

 

आरमोरी ता. प्र. प्रज्ञानंद धोंगडे :

अखिल भारतीय ओबिसी महासंघ पुरस्कृत राष्ट्रीय ओबीसी महासंघ तर्फे आज स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये रद्द करण्यात आलेले राजकीय आरक्षण , तसेच ओबीसींची जनगणना करण्यात यावी अशा विविध प्रलंबित मागण्यासाठी निदर्शने करीत मा. मुख्यमत्र्यांना मा. तहसीलदार डहाट साहेब यांच्या मार्फत निवेदन देण्यात आले.
निवेदनात जातनिहाय जनगणना, स्थानिक स्वराज्य संस्था मधील राजकीय आरक्षण, मराठा समाजाचा ओबीसी समाजात समावेश करू नये, ओबीसी समाजाचे आरक्षण १९% करण्यात यावे, यासह इतर मागण्यांचा समावेश आहे.
यावेळी ओबीसी महासंघाचे तालुका अध्यक्ष चेतन भोयर , उपाध्यक्ष प्रवीण ठेंगरी , सचिव मिथुन शेबे , संदीप राऊत , मनीष राऊत , मिलिंद खोब्रागडे , गुलाब मने , आशिष मने , विलास गोंदोळे , मधुसूदन चौधरी , मंजुषा ताई दोनाडकर , रिंकू झरकर , विजय सुपरे , प्रा. डॉ. के टी किरणापुरे , हरेष बावनकर , पंकज खरवडे , जितु ठाकरे , कृष्णा खरकाटे , संद्या टीचकुले
तसेच महाराष्ट्र इंटक चे अध्यक्ष विनोद पटोले , देसाईगंज चे माजी नगराध्यक्ष जेसाभाऊ मोटवानी , आरमोरी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष मनोज वनमाळी , वामनराव सावसागडे , जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई दोनाडकर , माजी पंचायत समिती सभापती अशोक वाकडे , मिलिंद खांदेशकर , रोशनी बैस , शालिकराम पत्रे , डॉ. संगीता रेवतकर इत्यादी उपस्थित होते .