भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी स्मृतीस अभिवादन करण्यात आले

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

तुकुम प्रभाग क्र. ०१ चे नगरसेवक सुभाष कासनगोटटूवार महामंत्री चंद्रपूर महानगर, प्रज्ञा ताई बोरगमवार महामंत्री महिला आघाडी, मायाताई उईकें नगरसेविका, अनिल फुलझेले नगर सेवक, पूर्शोत्ताम सहारे महामंत्री तुकुम मंडळ भाजपा यांचे प्रमुख उपस्थितीत व डॉक्टर मंगेशजी गुलवाडे आणि ब्रिजभूषण पाझारे महामंत्री चंद्रपूर महानगर यांचे अध्यक्षतेखाली श्रद्धांजली घेण्यात आली. आज २३ जून २०२१ रोजी भारतीय जनसंघाचे संस्थापक, देशाच्या ऐक्यासाठी प्राणाची आहुती देणारे थोर नेते डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृतीस सुभाष कासनगोटटूवार यांचे जनसंपर्क कार्यालय, निर्माण नगर सभागृह,आणि चांदमारी चौक येथे माल्यार्पण करून आदरांजली वाहिली.
या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर मंगेशजी गुलवाडे यांनी मार्गदर्शन केले. या प्रसंगी गजू भोयर, मायताई मांदडे, मंजुश्री कासनगोटटूवार, आशाताई मेश्राम, अन्याजी ढवस, धर्माजी खंगार, प्रशांत वारारकर, संजय भट्टलवर, मनोज हिवराळे, नागोराव कचाटे, सुरेशभाऊ तराले, घागी काका, धांडेकाका, संजय कोत्तावर, चंद्रप्रकाश गौरकार, अरविंद मडावी, रवींद्र तुमरम, राणी ताई कोस आदींची उपस्थिती होती.