आ.कृष्णाजी गजबे यांच्या स्थानीय विकास निधीतून कोंढाळा येथे रस्ता बांधकामाचे भुमीपुजन

 

प्रतिनिधी //अंकुश पुरी

देसाईगंज : तालुक्यातील कोंढाळा येथे आ.कृष्णाजी गजबे यांच्या स्थानीय विकास निधीतून मदन रामटेके ते मारोती राऊत व सोमेश्वर गुरूनुले ते दिवाकर झिलपे यांच्या घरापर्यंत सिमेंट रस्ता बांधकामाचे भुमीपुजन आ.कृष्णाजी गजबे यांच्या हस्ते करण्यात आले.
मदन रामटेके ते मारोती राऊत सिमेंट रस्ता बांधकाम किंमत १० लक्ष रूपये तर सोमेश्वर गुरूनुले ते दिवाकर झिलपे सिमेंट रस्ता बांधकाम किंमत ५ लक्ष रुपये किमतीचे काम मंजूर करून भुमीपुजन करण्यात आले.
यावेळी जि.प. च्या महीला व बालकल्याण सभापती रोषनीताई पारधी, सरपंचा अपर्णा राऊत, उपसरपंच गजानन सेलोटे, पो पा किरणताई कुंबलवार, माजी सभापती प्रिती शंभरकर, पंढरीची नखाते, नागोराव ऊके, सुनील पारधी, जयानंद बुराडे, दावींद्र बोरूले, नलीनी वालदे, ग्रामपंचायत सदस्य प्रफुल्ल मेश्राम, ठाकरे, माजी सैनिक देवदास नागोसे, आनंदराव बेदरे, रवींद्र शेंडे मा.ग्रा.प. सदस्य, बुथप्रमुख रूपेश ठाकरे, प्रकाश बेदरे ,राष्ट्रपाल शेंडे , प्रशांत मंडपे उपस्थित होते.