डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या स्मृती दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी चे वतीने प्रत्येक बुथावर दि.२३जुन ते ६ जुलै पर्यंत विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

प्रतिनिधी / / दीक्षा झाडे

दिनांक – 23 जून चामोर्शी
गडचिरोली-भारतीय जनता पार्टी गडचिरोली च्या वतीने सार्वभौम आणि स्वतंत्र भारताच्या एकात्मतेसाठी प्राणार्पण करणारे थोर सेनानी जणसंघाचे संस्थापक
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या हौतात्म्यास विनम्र अभिवादन करण्यासाठी २३ जून हा दिवस स्मृती दिवस म्हणून भारतीय जनता पार्टी तालुका चामोर्शी चे वतीने आमदार जनसंपर्क कार्यालय येथे अभिवादन करण्यात आले
या निमित्ताने चामोर्शी तालुक्यातील प्रत्येक बुथवर, डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करने तसेच २३ जून हा दिवस स्मृती दिवस म्हणून सर्व पदाधिकारी कार्यकर्ते व बुथप्रमुख यांनी आपल्या बुथावर कार्यक्रम घ्यावे. असे जाहीर आव्हान करण्यात आले
स्मृती दिन २३ जून ते ०६ जुलै जन्मदिवसापर्यंत हा साप्ताह विविध कार्यक्रमांचे आयोजन करून साजरा करावा.सर्व बुथवर वृक्षारोपण करणे.स्वच्छ भारत अंतर्गत गावात प्रत्येक वार्डात स्वच्छता मोहीम राबविणे व डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या जीवनावर आमदार डॉ देवराव होळी यांनी. व्याख्यान दिले
यावेळी प्रामुख्याने जिल्हा परिषद कृषी सभापती रमेश भाऊ बारसागडे भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख भाजप गट नेते प्रशांत येगलोपवार , भाजप ओबीसी आघाडी जिल्हा महामंत्री आशीष भाऊ पिपरे , युवा नेते प्रतीक राठी , लोमेश सातपुते , संतोष बुरांडे , किरमे सर . उपस्थित होते, तसेच बोलतांना आमदार डॉ देवराव होळी यांनी सांगितले जिल्ह्यातील सर्व तालुका प्रभारी,पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी आयोजित विविध कार्यक्रम पार पाडावे.