गडचिरोली जिल्ह्यामधील देसाईगंज शहरात घाणीचे साम्राज्य पसरवून नागरिकांचे आरोग्य धोक्यात असल्याप्रकरणी सखोल चौकशी करून कारवाही करण्याची मागणी; देसाईगंज युवक काँग्रेस शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्या कडे केली

 

प्रतिनिधी //अंकुश पुरी

देसाईगंज // नगरपालिका अंतर्गत स्वच्छतेचे कंत्राट मागील वर्षी सन २०२०-२०२१ ला ९६ लक्षरुपयात देण्यात आले होते.मागील वर्षी तुरळक तक्रारी वगळता स्वच्छतेचे काम चांगल्या पद्धतीने सुरू होते. चालू वर्षी सदर स्वच्छतेचे कंत्राट सन २०२१-२०२२ च्या स्वच्छतेचे कंत्राट२ कोटी १३ लक्ष रुपयात देण्यात आले. असून नगर प्रशासनाद्वारे कंत्राट दाराला सस्वच्छतेच्या गैरव्यवहाराविषही पूर्ण मोकळीक देण्यात आल्याचे चित्र पहावयास मिळत असून शहरातील अनेक वॉर्डामध्ये घाणीचे साम्राज्य पसरले आहे । कंत्राट दार केवळ मजुरांना रोजंदारीवर ठेवण्याचं दिखावा करून शहरातील स्वच्छतेकडे पूर्णता दुर्लक्ष करीत आहे। सदर कंत्राट दाराला नगर प्रशासन द्वारे देण्यात येणाऱ्या २ कोटी१३ लक्ष रुपयांच्या रकमेचा उपहार होण्याची शक्यता नाकारता येत नाही। कंत्राट दाराला आणि नगरप्रशासनाला वर्तमान पत्राच्या माध्यमातून अनेकदा शहरातील अस्वच्छतेची माहिती देण्यात आली। तरीसुद्धा प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे। त्यामुळे पावसात कचरा कुजून परिसरात साथीचे रोग पसरण्याची शक्यता नाकारता येणार नाही। सामान्य माणसाचे उदासीनता आणि नगरप्रशासनाची हतबलता यातून हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चाललेला आहे। शहरात कचऱ्याचे ढीग जमा होतात, कचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने नाही लावली तर अस्वच्छता,आजार, प्रदूषण आणि पर्यावरणाच्या त्रास होऊन अनेक प्रश्न त्यातून निर्माण होतात। याची दखल घेत युवक काँग्रेसचे शहर अध्यक्ष पिंकु बावणे यांनी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांसोबत जिल्हाधिकारी गडचिरोली याना ही बाब निवेदनाच्या माध्यमातून लक्ष्यात आणून दिली आणि संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून संबंधित अधिकाऱ्यावर कारवाही करण्याची मागणी केली। जिल्हाधिकारी गडचिरोली यांनी दखल घेऊन चौकशी करण्याचे अश्वासन युवक काँगेस देसाईगंज याना दिले। यावेळी उपस्थित युवक काँग्रेस शहरअध्यक्ष पिंकु बावणे, ओबीसी शहर अध्यक्ष नितीन घुले, राहुल सीडाम, सुनील चिंचोलकर, भारत गराडे सह युवक कॉंग्रेस चे करकर्ते उपस्थित होते।