ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ईसीजी टेक्निशियन या पदाचा प्रश्न निकाली माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या प्रयत्नांचे फलित

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

कोरोना काळात बल्लारपूर येथील ग्रामीण रुग्णालयात हे पद दीर्घकाळ रिक्त असल्यामुळे रुग्णांची होणारी गैरसोय लक्षात घेता माजी अर्थमंत्री आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ईसीजी टेक्निशियन या पदावर विशेष बाब या स्वरूपात कर्मचाऱ्याची पदस्थापना करण्यात आली आहे. जिल्हा शल्य चिकित्सक सामान्य रुग्णालय चंद्रपूर यांच्या आदेशानुसार कु. विभा रामटेके यांची पदस्थापना सदर पदावर करण्यात आली आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव असताना देखील ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ईसीजी टेक्निशियन उपलब्ध नसल्यामुळे रुग्ण त्रस्त झाले होते. या संबंधात आ. सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या असता, त्यांनी विशेष बाब या सदराखाली ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ईसीजी टेक्निशियन हे पद तातडीने भरावे यासाठी प्रयत्न व पाठपुरावा केला. अखेर हे सदर पदावर विभा रामटेके यांची पदस्थापना करण्यात आल्याने
ग्रामीण रुग्णालय बल्लारपूर येथे ईसीजी टेक्निशियन या पदाचा प्रश्न सुटला आहे .