प्रतिनिधी // दीक्षा झाडे
दिनांक 21 जून2021
गडचिरोली – भारतीय जनता पार्टी गडचिरोली जिल्हा येथील पदाधिकाऱ्यांची बैठक गडचिरोली येथील साई मंदिर सभागृह येथे आज आमदार डॉ परिणय फुके यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.
या बैठकीमध्ये खा. श्री अशोकजी नेते, जिल्हाध्यक्ष श्री किसनजी नागदेवे, आ.श्री डॉ देवरावजी होळी आ.श्री.कृष्णनाजी गजबे, प्रमोदजी पिपरे, बाबुरावजी कोहळे, प्रशांत वाघरे, रवींद्र ओल्लालवार, योगिता पीपरे, प्रकशजी गेडाम, सदानंद कुथे सर्व आघाडीचे प्रमुख, तालुका पदाधिकारी व महामंत्री उपस्थित होते.
या बैठकीमध्ये आमदार डॉ परिणय फुके म्हणाले की, ४ मार्च २०२१ रोजी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार राज्यात २७ टक्के ओबीसी आरक्षण संपविण्यात आले. एकीकडे ओबीसी च्या नावाखाली मते घ्यायची, मोठे मोठे मोर्चे काढायचे आंदोलने करायची आणि लोकांना सांगायचे की ओबीसी आरक्षण कमी होऊ देणार नाही आणि दुसरीकडे मात्र ओबीसी समाजाच्या विरोधात षडयंत्र रचून ओबीसी आरक्षण राज्यात संपवन्याचा खेळ ही महाभकास आघाडी करीत आहे ओबीसी मंत्रालय काँग्रेसकडे असूनही सर्वोच्च न्यायालयात महविकास आघाडी सरकारला याबाबत योग्य भूमिका मांडता आली नाही. काँग्रेस नेत्यांनीच ओबीसी आरक्षण संपविण्यासाठी याचिका दाखल केली असेल तर हे काँग्रेस नेते बोलणार तरी कसे ? न्यायालयाने आदेश दिल्यानंतरही महाविकास आघाडी सरकार ओबीसी साठी आयोग स्थापन करीत नाही. ओबीसी बांधवांना आरक्षण मिळावे असे या सरकारलाच वाटत नाही ही वसतुस्थिती असून या निमित्ताने काँग्रेस नेत्यांचा ढोंगीपणा जनतेसमोर आला आहे ओबीसी समाज काँग्रेसला आणि या महाविकास आघाडी सरकारला कधीच माफ करणार नाही, असा इशारा आमदार डॉ. परिणय फुके यांनी देत, येत्या 26 तारखेला गडचिरोली सह संपूर्ण बाराही तालुक्यामध्ये सर्व आघाडीचे पदाधिकारी रस्त्यावर उतरून जेल भरो आंदोलन करून या सरकारने केलेल्या अन्यायाबद्दल वाचा फोडू असे सांगितले.