जागतिक योग दिनाच्या कार्यक्रमात सहभागी व्हा – मान. हंसराज अहीर

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

दि. 21 जून 2021 रोजी जागतिक योग दिवसा निमित्य जगभरात योग दिन साजरा होतो आहे. महान ऋषीमुनींनी परिश्रमपूर्वक यौगीक क्रियेचा प्रचार आणि प्रसार करून या देशाला फार मोठी विरासत दिली आहे. योगगुरू स्वामी रामदेव बाबांनी योगक्रीयेचा पूनःरूध्दार करून देशातच नव्हे तर जागतिक स्तरावर योगाला प्रतिष्ठा मिळवून दिली आहे. मा. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांनी संपूर्ण विश्वाला योगाभ्यासाचे महत्व पटवून दिल्याने 21 जून 2016 पासून वैश्वीकस्तरावर सुमारे 175 देशांनी या जागतिक योग दिवसाचा स्विकार करून तो साजरा करण्यात पुढाकार घेतला आहे.
आजच्या जागतिक योग दिवसाच्या अनुशंगाने सर्वच स्तरावर योग दिवसाचे मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आले असल्याने तसेच भाजपा, भाजयुमो च्या वतीने चंद्रपूर जिल्ह्यामध्ये योग दिनाचे विशेष आयोजन केले आहे. चंद्रपूर शहरातील पाचही प्रभागामध्ये भाजपाने योग दिवसा निमित्य यौगीक क्रीयेचे आयोजन केले आहे. त्यामुळे सुदृढ व स्वस्थ आरोग्यासाठी या कार्यक्रमांमध्ये नागरीकांनी उत्स्फुर्तपने सहभागी होवून योगाला आपल्या जिवनाचा अविभाज्य घटक बनवावा असे आवाहन पूर्व केंद्रीय गृहरज्यमंत्री तथा राष्ट्रीय उपाध्यक्ष भाजपा ओबिसी मोर्चा हंसराज अहीर यांनी केले आहे.
कोरोनाच्या संक्रमण काळामध्ये अनेकांनी योग विद्येला अनुसरून आपले आरोग्य सुरक्षीत राखण्यात यश मिळविले होते. याचे स्मरण करून देतांना योग दिवसाचे महत्व जाणुन प्रत्येकाने योगाला आपल्या जिवनात प्रमुख स्थान द्यावे असे आवाहन करतांनाच जागतिक योग दिनाच्या नागरीकांना शुभेच्छा हंसराज अहीर यांनी दिल्या आहेत.