युवा इंटकच्या विदर्भ संघटक पदी अनिकेत अग्रवाल यांची निवड

 

बल्लारपूर (राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

गेल्या अनेक वर्षांपासून तरुणांना हाताशी धरून शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण कामगिरी करीत काँग्रेस पक्षाशी एकनिष्ठ असलेल्या अनिकेत अग्रवाल यांची युवा इंटकच्या विदर्भ संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती महाराष्ट्र इंटक प्रदेश अध्यक्ष जयप्रकाश छाजेडजी यांनी केली व नियुक्तीचे पत्र विदर्भ महिला इंटकच्या अध्यक्षा सौ.अर्चनाताई भोमले यांच्या हस्ते देण्यात आले. चंद्रपुरचे लोकप्रिय खासदार बाळुभाऊ धानोरकर यांनी अनिकेत अग्रवाल यांचे नियुक्ती झाल्याबद्दल पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी विजयभाऊ धोबे, हनिफभाई शेख हे उपस्थित होते.