अनुसुचित जाती व नवबौद्ध मुलांच्या शासकीय निवासी शाळेत प्रवेश अर्ज आमंत्रित

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागातर्फे चंद्रपूर जिल्ह्यात सन 2012-13 पासून वर्ग 6 वी ते 10वी सेमी इंग्रजी माध्यमाची अनुसूचित जातीच्या मुलांकरीता शासकीय निवासी शाळा, भिवकुंड ( विसापूर) ता. बल्लारपूर येथे सुरू करण्यात आली आहे. सदर शाळा निवासी असून शाळेमध्ये वसतिगृहाची सोय केलेली आहे. या वस्तीगृहातील विद्यार्थ्यांना सकाळचा नाश्ता, दोन वेळचे जेवण, निवासी व्यवस्था तसेच इतर शैक्षणिक सुविधा मोफत पुरविण्यात येतात. विद्यार्थ्यांना गुणवत्तेनुसार प्रवेश देण्यात येत असून प्रवेशाकरीता अर्जाचे वाटप व प्रवेश देणे 15 जुलै 2021 पर्यंत सुरू आहे.

तरी अनुसूचित जातीच्या विद्यार्थी व पालकांनी वर्ग 6 वा तसेच वर्ग 7 ते वर्ग 9 चा रिक्त जागेवर प्रवेशासाठी संबंधित शाळेत संपूर्ण तपशिलासह अर्ज सादर करावा,असे आवाहन, समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त, अमोल यावलीकर यांनी केले आहे.

प्रवेशासाठी या क्रमांकावर साधा संपर्क:

प्रवेशासाठी विद्यार्थी व पालकांनी सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, चंद्रपूर दूरध्वनी क्रमांक 07172-253198 व अनु.जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय शाळा, भिवकुंड,बल्लारपूर गृहपाल डी.एस. खराबे मो. क्र. 8275299320, मुख्याध्यापक एन. एस. कोडापे मो. क्र. 9970878265 या क्रमाकांवर संपर्क साधावा.