चामोर्शी येथे फेडरेशन च्या वतीने सेवा सहकारी सोसायटी चे माध्यमातून शासकीय गोडाऊन येथे मका केंद्र सुरू

गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी व धानोरा येथे आजपासून खरेदी केंद्र सुरू केले

आमदार डॉ देवराव होळी यांच्या आंदोलनाचे फलित

चामोर्शी व धानोरा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने आमदार डॉ होळी यांचे जाहीर अभिनंदन

प्रतिनिधी // दीक्षा झाडे

दिनांक 17 जून २०२१ गडचिरोली
राज्य शासनाने मका खरेदी करण्याचा निर्णय घेवून १ आठवडा होत आहे तरी देखील गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील एकाही तालुक्यात मका व धान खरेदीचे एकही केंद्र सुरू करण्यात आले नव्हते. २५मे पासून धान व मका खरेदी करणाऱ्या प्रशासना विरोधात गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी कार्यालय सामोर लोकसहभागातून शेतकऱ्यांनी आंदोलन केल्याने आदिवासी विकास महामंडळाच्या व मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी गडचिरोली विधानसभा क्षेत्रात अजुनपर्यंत मका खरेदी केंद्र सुरू केले नव्हते. त्यामुळे शेतकरी विरोधी व शासनाच्या आदेशाची पायमल्ली करणाऱ्या अधिकाऱ्यांना धडा शिकवण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आमदार डॉ देवरावजी होळी यांनी केले होते
राज्य शासनाने ८ जून २०२१ रोजी संपूर्ण राज्यात आदिवासी विकास महामंडळ,जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व शासनाच्या खरेदी यंत्रणेमार्फत मका खरेदी केंद्र सुरू करण्याबाबतचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. हा आदेश होऊन आठवडा होत आहे परंतु अजून पर्यंत गडचिरोली विधानसभा क्षेत्रातील चामोर्शी गडचिरोली व धानोरा तालुक्यात एकही मका खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही. याबाबत आमदार डॉ देवराव होळी यांनी जिल्हाधिकारी यांना अवगत केले. व मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यास संबंधित अधिकारी टाळाटाळ करीत आहेत. यामागे शेतकऱ्यांनी आपल्या विरोधात आंदोलन उभे केल्याने त्यांना शिक्षा मिळावी याकरिता व व्यापाऱ्यांचे हित लक्षात घेवून आपला आर्थिक लाभ व्हावा यासाठी जाणीवपूर्वक खरेदी केंद्र सुरू करण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप आमदार डॉक्टर देवरावजी होळी यांनी केला होता
आदिवासी विकास महामंडळ व मार्केटिंग फेडरेशनच्या अधिकाऱ्यांनी तातडीने खरेदी केंद्र सुरू न केल्यास शेतकऱ्यांच्या हितासाठी अशा अधिकाऱ्यांविरोधात शासनस्तरावर कारवाई करण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे आमदार डॉ देवरावजी होळी यांनी म्हटले होते
परंतु आज जिल्हा प्रशासनाने आमदार डॉ देवराव होळी यांच्या पाठपुराव्याने आजपासून चामोर्शी येथील शासकीय गोडाऊन येथे विधिवत मक्का खरेदी केंद्र सुरू करण्यात आले यावेळी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अतुल सावकार गण्यारपवार उपविभागीय अधिकारी तोडसाम  , तहसीलदार शिकतोडे व सेवा सहकारी संस्था पदाधिकारी अमोल गण्यारपवार , व्यवस्थापक
पोरटे , ग्रेडर ,व शासकीय अधिकारी उपस्थित होते