आरमोरी न.प.चे ७०सफाई कामगारांनी कुटुंबासाहित केले चक्काजाम आंदोलन

आरमोरी तालुका प्रतिनिधी // प्रज्ञानंद धोंगडे

नगरपरिषदेने३ महिन्यापासून कामावरून बंद केलेल्या सफाई कामगारांना तात्काळ कामावर घेण्यात यावे,आरमोरी नगरपरिषदेच्या सफाई कामगारांना किमान वेतनानुसार बँकेतुन वेतनअदा करण्यात यावे, सफाई कामगारांचा भविष्य निर्वाह निधी व विमा काढण्यात यावा , आरमोरी न.प.च्या मुख्याधिकारी व संबंधित अभियंता यांनी कर्तव्यात कसूर केल्याने त्याचेवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी आदी मागण्यांसंदर्भात शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आरमोरी नगरपरिषदेतील ७० सफाई कामगारांनी कुटुंबासाहित दिनांक १६ जूनला जुन्या बसस्टॉपवर गडचिरोली जिल्हा आदिवासी काँग्रेस सचिव दिलीप घोडाम, प्रहार संघटनेचे तालुकाध्यक्ष निखिल धार्मिक सफाई यांच्या नेतृत्वात चक्काजाम आंदोलन केले.