गडचिरोली जिल्ह्यात प्रथमच लोकप्रतिनिधी द्वारा पोलीस विभागाचे मनोबल उंचावण्यासाठी कोरोना योद्धा म्हणून सत्कार

 

प्रतिनिधी // प्रज्ञानंद ढोंगडे

गडचिरोली , दिनांक 15जून
गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांच्या पुढाकाराने गडचिरोली जिल्ह्यात अहोरात्र काम करून भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या आव्हानाला प्रतिसाद देत कोविड -19 या जागतिक महामारीच्या विरोधात संपूर्ण देश लढा देत आहे ,या घातक महामारीत काही राज्य सरकारचे पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉक्टर्स यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता सर्वसामान्य गोरगरीब जनतेसाठी केलेले कार्य अत्यंत प्रेरणादायी आहे,
काही कर्मचाऱ्यांनी यांनी दाखवलेली हिम्मत ,साहस ,सातत्य खरोखरच प्रेरणादायी आहे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील केंद्र सरकारला सात वर्षे पूर्ण झाले आहे यानिमित्ताने गडचिरोली जिल्ह्यातील दोन हजार निवडक राज्य सरकारच्या पोलीस अधिकारी कर्मचारी व डॉक्टर्स यांना कोविड योद्धा म्हणून प्राशिस्ती पत्र देऊन गौरव करण्याचा संकल्प आमदार डॉ देवराव होळी यांनी केले आहे
या निमित्याने आमदार डॉ देवराव होळी यांनी सदर कोविड योद्धा म्हणून गौरव करण्याचा सुरुवात आज अतिसंवेदनशील पोटेगाव पोलीस स्टेशन येथून सुरू केले येथील निवडक पोलीस निरीक्षक व उपनिरीक्षक ,सी,आर,पि,एफ , बटालियन अधिकारी कर्मचारी यांचा कोविड योद्धा म्हणून प्रशीस्ती पत्र देऊन गौरव केला आणि सर्वांना शाबाशी देऊन पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिले आणि येथील पोलीस विभागाचे मनोबल उंचावण्याचे कार्य केले यावेळी पोलीस स्टेशन पोटेगावचे पोलीस निरीक्षक बानोत साहेब , भाजपा तालुका अध्यक्ष दिलीप चलाख , गडचिरोली भाजप तालुका महामंत्री हेमंत पाटील बोरकुटे भाजपा ज्येष्ठ नेते जयराम चलाख
व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते