गडचिरोली जिल्ह्यातील खाजगी लॅब प्रशासनाने बंद करू नये  आमदार डॉ देवराव होळी

प्रतिनिधी // आशिष दरडे

चामोर्शी – येथील खाजगी लॅब असोशियन पदाधिकारी यांनी गडचिरोली विधानसभा मतदार संघाचे आमदार डॉ देवराव होळी यांचे आमदार जनसंपर्क कार्यालय येथे भेट दिली व निवेदन देऊन आपले व्यथा मांडल्या आधीच सदर लॅब चालक कोरोना महामारित लॅब न चालल्याने त्यांचा व्यवसायास खूप नुकसान झाले आहे त्यातच पुन्हा प्रशासनाने आपले रजिस्ट्रेशन झाल्याशिवाय लॅब सुरू करू नका अशी तंबी दिली आहे त्यामुळे सध्या तालुक्यातील सर्व लॅब बंद करण्यात आले आहे त्यामुळे येथील स्थानिक सुशिक्षितबेरोजगार तरुणांवर पुन्हा बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली आहे या बाबत आमदार डॉ देवराव होळी यांना येथील लॅब पदाधिकारी यांनी भेट देऊन व्यथा मांडली व आमचे लॅब प्रशासनाला
जाब विचारून तत्काळ सुरू करण्यात यावे अशी मागणी केली यावेळी आमदार डॉ देवराव होळी यांनी तत्काळ लॅब चालक यांच्या तक्रारीची दखल घेऊन चामोर्शी येथील तहसीलदार शिकतोडे तालुका आरोग्य अधिकारी लाईबर , पोलीस निरीक्षक शेवाळे
यांच्या सोबत भ्रमण ध्वनी वर संपर्क साधून अवगत केले
व रजिस्ट्रेशन येईपर्यंत कोणतेही खाजगी लॅब बंद करण्यात येऊ नये अशी मागणी केली व सांगितले लॅब चालकांचे लॅब रजिस्ट्रेशन सध्या प्रक्रियेत आहेत
सध्या जोपर्यंत लॅब रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत प्रशासनाने समस्त लॅब सुरू ठेवण्याकरिता मी लवकरच जिल्हाधिकारी व मंत्रालय मुंबई येथील वरिष्ठ अधिकारी यांच्या सोबत चर्चा करनार आहे असे सांगितले यावेळी भाजप तालुका अध्यक्ष दिलीप चलाख लॅब चालक असोशियन पदाधिकारी सुधीर चावरे विपुल सरदार ,अरुण गव्हारे , मनमतो सरकार , हितेश
मेश्राम व पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते