जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी केला चौडमपली गावाचा दौरा गावाच्या निर्मितीनंतर गांवात येणारे पहिले अध्यक्ष

 

विशेष प्रतिनिधी // पूजा दब्बा

जिल्हा परिषदेचे अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी चौडमपली गांवात दौर केले असता सदर आपभिती समोर आली आरेंद ते चौडमपली हे अंतर तीन कि.मि.असुन कच्चा रस्ता असुन या मधे एक नाला असल्याने सदर गावाच्या सम्पर्क तुटत असतो एवढेच नाही तर सदर नाल्यावर पूल्या नसल्याने गरीब कुटूंबाना मिळणार स्वस्तधान्य आरेंद येतून घेवून जावे लागते असे सांगत आम्हाला पूल्या बनवुन द्या अशी मागणी करत म्हणाले आम्ही नेहमीच मतदानाचा हक बजावुन लोकप्रतिनिधी निवडुन देत असतो गेल्या कित्येक निवडनूकित सर्व नेते,आम्हाला आश्वासन देत आहेत मात्र कोणीच सदर काम करत नाही,
स्थानिक क्षेत्रातून निवडुन आल्यानंतर मात्र याकडे दुर्लक्ष करत असतात.मात्र या गांवात केव्हाच येत नाही समस्या जाणून घेत नाहीत मात्र श्री.अजयभाऊ कंकडालवार हे जिल्हा परिषदेचे पहिले अध्यक्ष आहेत कि त्यांनी आम्हच्या गांवात आले आम्हाच्या समस्या जाणून घेतले आणि सदर पूल्या बनवुन देतो अशी आश्वासन नाही लेखी शब्दच दिले आहे.असे म्हणत अध्यक्ष आल्याच आनंद व्यक्त केले.
नागरिकांसोबत एक तास चर्चा करून समस्या ऐकून घेतले व निराकरण करून देण्याच्या ग्वाही दिली.असून नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
यावेळी अहेरी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे होते,तेव्हा नागरिकांनी अचंबित होत या तालुक्यातील गावाजवळील कित्येक सभापती होऊन गेले मात्र आम्हाच्या गांवात कधीच आले नाही आता तर आम्हाचे क्षेत्राचे पंचायत समिति सदस्य,जि.प.सदस्य हे पण आले नसून आम्हाचे वाली कोण असे प्रश्न उपस्थित केले.
चौडमपली येतील नाल्याच्या पाहणी पण यावेळी करण्यात आले असुन सदर नाल्यावर पुला आवश्यक असुन जिल्हा परिषदेतून निधी ३० लाख निधी लवकरच उपलब्ध करून देवू अशी ग्वाही जि.प.अध्यक्ष श्री.अजयभाऊ कंकडालवार यांनी दिले आहे.
यावेळी पंचायत समितीचे सभापती श्री.भास्कर तलांडे,जि.प.सदस्य श्री.अजय नैताम,पेरमिलीचे सरपंचा सौ.किरण नैताम,मेडपलीचे सरपंच श्री.निलेश वेलादी,ग्रा.प.सदस्य श्री.प्रमोद आत्राम, बंडु आत्राम ,मादी आत्राम,सोमा आत्रम,शांती कूळमेथे,आविस शहर अध्यक्ष श्री.प्रशांत गोडसेलवार,आविसचे कार्यकर्ते श्री.आशीफ खाँ पठाण,तुळशीराम चंदनखेळे,कवीश्वर चंदनखेडे,बंडु आत्राम,आदि उपस्थित होते.
यावेळी गावातील नागरिक,महिला बचत गटाचे महिला व युवक उपस्थित होते.