
प्रतिनिधी //अंकुश पुरी
गडचिरोली : जिल्ह्यात मान्सून दाखल झाला आहे. अनेक भागात पाऊसाने हजेरी लावली. अशातच रात्रोच्या सुमारास शहरात मुसळधार पावसाने हजेरी लावली. अनेक ठिकाणी डबके तयार होऊन पाणी साचले. शहरातील चामोर्शी मार्गावरील सेलिब्रेशन हॉल समोरील डबक्यात दुर्मिळ ‘इंडियन बुल फ्रॉग’ (पिवळा रंग ) बेडूकाचे दर्शन सकाळच्या सुमारास झाले. सदर बेडूक दुर्मिळ असल्याने बघ्यांनी गर्दी केली होती.
अनेकदा पावसात असे प्राणी, किडे, कीटक पाहायला मिळतात, त्यातीलच हे पिवळ्या रंगाचे बेडूक आहेत. नेहमीच्या बेडकांपेक्षा या बेडकांचा आवाज थोडा वेगळा असतो आणि मुख्य म्हणजे नावाप्रमाणे यांचा रंग पूर्णतः पिवळा धम्मक असतो. शहरातील चामोर्शी मार्गावरील सेलिब्रेशन हॉल समोरील परिसरात हे पिवळे बेडूक दिसून आले.
दरम्यान, हे बेडूक Indian Bullfrogs या वैज्ञानिक नावाने ओळखले जातात, यांचा आकार मोठा असतो मात्र यांचा धोका नसतो. हे विषारी बेडूक नसतात. भारत, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ, म्यानमार, श्रीलंका या देशात या प्रजाती आढळून येतात. पिवळा हा त्यांचा खरा रंग नसतो मुळात हे बेडूक ऑलिव्ह ग्रीन रंगाचे असतात मात्र प्रजनन प्रक्रिया करण्याआधी ते रंग बदलून पिवळे होतात.