डॉ आंबेडकर स्मारकासाठी बसपा चे भव्य  निदर्शन

 

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

नागपुरातील यशवंत स्टेडियम च्या खुल्या जागेवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर जन्मशताब्दी स्मारक बनवावे, अंबाझरी येथील दोन दिवसापूर्वी तोडलेले आंबेडकर सांस्कृतिक भवनाची पुनर्बांधणी करावी व मेडिकल चौकात आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू यांचा भव्य पुतळा व स्मारक बनवावे या प्रमुख मागण्यासाठी बहुजन समाज बहुजन समाज पार्टीने आज संविधान चौकात मनपा व राज्य सरकारच्या विरोधात भव्य धरणे व निदर्शने केली.
भव्य धरणे व निदर्शनाचे नेतृत्व महाराष्ट्र प्रदेश बसपाचे महासचिव नागोराव जयकर, महाराष्ट्र प्रदेश सचिव उत्तम शेवडे, नागपूर जिल्हाध्यक्ष संदीप मेश्राम, नागपूर मनपातील बसपाचे पक्षनेते जितेंद्र घोडेस्वार यांनी केले. धरणे निदर्शनाचा कार्यक्रम दुपारी 12 वाजता पासून तर 4 वाजेपर्यंत चालला.
या धरणे निदर्शने कार्यक्रमात पूर्व नागपूरचे अध्यक्ष जितेंद्र मेश्राम, पश्चिम नागपूर चे अध्यक्ष मनोज निकाळजे, उत्तर नागपूरचे प्रताप सूर्यवंशी, दक्षिण नागपूरचे अध्यक्ष नितीन वंजारी, मध्य नागपूर चे अध्यक्ष प्रवीण पाटील, हिंगणा विधानसभेचे अध्यक्ष शशिकांत मेश्राम, काटोल विधानसभेचे मेघराज गोडबोले, माजी जिल्हाध्यक्ष राजकुमार बोरकर, युवानेते चंद्रशेखर कांबळे, हिंगण्याचे सुरेश मानवटकर, कामठीचे नागसेन गजभिये, सुरेंद्र डोंगरे, वीरेंद्र कापसे, सागर लोखंडे आदींनी याप्रसंगी शासनाचा निषेध करून आपले मनोगत व्यक्त केले.
धरणे निदर्शकांच्या वतीने निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे व नागपूर महानगर पालिकेचे आयुक्त बी राधाकृष्णन यांना शिष्टमंडळाचे निवेदन देऊन त्यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली. या शिष्टमंडळात नागोराव जयकर, उत्तम शेवडे, जितेंद्र घोडेस्वार, संदीप मेश्राम प्रामुख्याने उपस्थित होते*
बसपा ने जिल्हाधिकार्यांना व मनपा आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की मागील 29 वर्षापासून शासन व प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे व जातीयवादी मानसिकतेमुळे हा आंबेडकर जन्मशताब्दी स्मारकाचा विषय जाणून प्रलंबित ठेवण्यात आलेला आहे. स्मारकांची मागणी नसतानाही सुरेश भट व स्वामी विवेकानंदाचे स्मारक मनपा बनवू शकते. परंतु लाखो लोकांची मागणी असूनही फक्त बाबासाहेबांचे नाव असल्याने त्या स्मारकाला राज्य व मनपाचे शासन जाणून बगल देते असा आरोप बसपा नेत्यांनी करीत नागपुरातील राज्याचे व केंद्राचे नितीन नावाचे मंत्रीद्वय यांच्या मनुवादी षड्यंत्रा मुळेच ह्या स्मारकाचा प्रश्न लोंबकळत असल्याचाही आरोप केला आहे.
या स्मारकासाठी आत्तापर्यंत विलासराव देशमुख, सुशील कुमार शिंदे, पृथ्वीराज चव्हाण, देवेंद्र फडणवीस व आताचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अनेक निवेदने देण्यात आलेली आहेत.
5 जूनला नागपूरचे पालकमंत्री नितीन राऊत यांना सुद्धा भेटून आंबेडकर स्मारकामागील भाजप-काँग्रेसच्या गोडबंगालाची सविस्तर माहिती मागितली आहे. परंतु केंद्रीयमंत्री नितीन गडकरी व राज्यमंत्री नितीन राऊत यांच्या मिलीभगत मधूनच अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन तोडण्यात आल्याचा आरोप बसपाने याच दोन नेत्यावर करून त्यांचा जाहीर निषेध देखील केला आहे.
अंबाझरी येथील ऐतिहासिक आंबेडकर सांस्कृतिक भवनात यापूर्वी 1972 ला राजाभाऊ खोब्रागडे यांच्या नेतृत्वातील अखिल भारतीय बौद्ध शिखर परिषद तसेच बहुजन नायक कांशीरामजी व भदंत आनंद कौसल्यायनजी यांच्या नेतृत्वातील 29, 30, 31 डिसेंबर 1983 व 1 जानेवारी 1984 ला बौद्ध धम्माची दिशा, दशा व उपाय या विषयावर बौद्ध अध्ययन केंद्र (BRC) द्वारे घेतलेले सेमिनार व खुले बौद्ध संमेलनाची ही वास्तुं साक्ष देत होती.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या आरक्षण शताब्दी वर्षानिमित्त 2002 ला बहुजन समाज पार्टीच्या 9 नगरसेवकांनी मेडिकल चौकातील खुल्या जागेवर त्यांचा पूर्णाकृती पुतळा व स्मारक उभारण्याचा प्रस्ताव दिला होता, तो मनपाने पास सुद्धा केलेला आहे. परंतु मागील 20 वर्षात त्यावर मनपातर्फे काहीही करण्यात आलेले नाही. त्यामुळे येत्या 26 जूनला त्यांच्या जन्मदिनी शाहूंच्या स्मारकाचे भूमिपूजन करावे अशी मागणी बसपाने याच निवेदनात केलेली आहे.
धरणे-निदर्शने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दक्षिण पश्चिम नागपूरचे विधानसभा अध्यक्षसदानंद जामगडे ह्यांनी तर कार्यक्रमाचा समारोप बसपाचे माजी पक्षनेते गौतम पाटील यांनी केला.
धरणे निदर्शने कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मनपा सभापती वंदना राजू चांदेकर, विजय डहाट, अभिलेश वाहने, अभय डोंगरे, गौतम गेडाम, राजीव भांगे, सुनंदा नितनवरे, सुरेखा डोंगरे, वैशाली नारनवरे, माया उके, संजय जयस्वाल, अजय डांगे, योगेश लांजेवार, सुनील बारमाटे, मुकेश गजभिये, बुद्धम् राऊत, प्रकाश फुले, बबिता डोंगरवार, शालू वाघमारे, अविनाश नारनवरे, सुधाकर सोनकांबळे, शंकर थुल, प्रताप तांबे, सुनील कोचे, रोशन शेंडे, किरण पाली, सुबोध राऊत, धर्मपाल गोंगले, अमन गवळी, संभाजी लोखंडे, परेश जामगडे, विजय मोखाडे, मॅक्स बोधी, राजेश जांभूळकर, हेमंत बोरकर, सचिन मानवटकर, प्रीतम खडतकर, ताराचंद गोडबोले, प्रकाश डुले, जितेंद्र मेश्राम, राजेश नंदेश्वर, सूचित मेश्राम, विलास मून, अभय गजभिये, राजेंद्र सुखदेवे, जगदीश गेडाम, अनंता राऊत, ऍड आकाश खोबरागडे, लीलाधर मेश्राम, बाळू कांबळे, प्रकाश गजभिये, सुमित जांभुलकर आदी कार्यकर्त्यांचा प्रामुख्याने सहभाग होता. अशी माहिती उत्तम शेवडे प्रदेश मीडिया प्रभारी बसपा यांनी दिली आहे.