नकोड्यातील स्व. प्रमोदजी महाजन चौक ठरणार आकर्षणाचे केंद्र चौकाचे जि.प.सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांच्या हस्ते लोकार्पण झाले

बल्लारपूर( राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

चंद्रपुर तालुक्यातील नकोडा येथील स्व. प्रमोदजी महाजन चौक नागरिकांसाठी आता आकर्षणाचे केंद्र ठरणार आहे. गावाच्या प्रवेश मार्गावर हा चौक असल्याने पंचक्रोशीतील नागरिकांचे इकडे लक्ष लागले.या चौकाचे सोमवार(७जून)ला जि. प. सदस्य ब्रिजभूषण पाझारे यांचे हस्ते लोकार्पण आले.
यावेळी तहसीलदार , घुग्घुस पोलीस निरीक्षक घुग्गुस, सरपंच किरण बांदूरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर, प. स. सदस्य सविताताई कोवे, माजी सरपंच ऋषीजी कोवे ग्रा. प. सदस्य सौ.अर्चना पाझारे, सौ. तनुश्री बांदूरकर, रजत तुराणकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, प्रभाकर लिंगमपेल्ली, मा.श्री महादेवजी वाघमारे , बाळकृष्ण झाडे, सोमनाथ वाटाने यांची उपस्थिती होती.
भाजपा नेते प्रमोदजी महाजन यांचे जीवन संघर्षपूर्ण होते.भाजपाच्या यशस्वी वाटचालीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. युवकांचे ते प्रेरणास्थान होते. ती प्रेरणा सतत मिळत रहावी म्हणून सन २००७ मध्ये माजी वित्तमंत्री आ सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी नकोडा ग्रामपंचायतच्या प्रवेश मार्गावरील चौकाचे “स्व. प्रमोद महाजन चौक असे नामकरण करून, सौंदर्यीकरणाचा विषय ग्रामपंचायत नागरी सुविधा अंतर्गत निधी मार्फत मार्गी लावला. माजी समाजकल्याण सभापती, विद्यमान जि
प. सदस्य व भाजपा महानगर चंद्रपुर महामंत्री ब्रिजभूषण पाझारे यांनी सतत पाठपुरावा करून या चौकाचे सौंदर्यीकरण करून घेतले. दिनांक:07/06/2021 ला चौक आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे. चौकाचे लोकार्पण चर्चेचा विषय ठरला आहे. संपूर्ण विदर्भात तरी स्व. प्रमोदजी महाजन यांचे नावे, हा एकमात्र चौक असावा अशी चर्चा आता जिल्ह्यात सुरू आहे. भाजपाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकदातरी या चौकाला भेट द्यावी असे आवाहन सरपंच किरण बांदूरकर यांनी केले आहे.