प्रतिनिधी // दीक्षा झाडे
सिरोंचा:- तालुक्यातील आसरअल्ली, वडधम, सिरोंचा शहर , अमरादी येथे आमदार धर्मराव बाबा आत्राम यांच्या शुभहस्ते सोमवार 7 जून रोजी उन्हाळी धान खरेदी केंद्राचे फित कापून व वजन काटा करून शुभारंभ करण्यात आले.
यावेळी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्रीताई आत्राम, राष्ट्रवादी महिला काँग्रेसचे जिल्हाध्यक्षा शाहीन भाभी हकीम, उपसभापती रिक्कुला कृष्णमूर्ती, तहसीलदार सैय्यद हमीद, नगर पंचायतीचे मुख्याधिकारी विशाल पाटील, संवर्ग विकास अधिकारी सतीश चिटकुले, विपणन निरीक्षक जे.ए. तलांडी आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी, उन्हाळी धानाच्या खरेदीला सुरुवात झाली असून शेतकऱ्यांनी सुरक्षित अंतर राखून व कोरोनविषयी शासनाने ठरवून दिलेल्या नियमांचे पालन करून धान खरेदी केंद्रावर धानाची विक्री करून याचा लाभ घेण्याचे आवाहन केले.
यावेळी ग्रेडर अनंत आलम मदनय्या मादेशी, एम.डी.शानु, रामकीष्टु नीलम, देवय्या येनगणदुला, नागरेड्डी गोडीमेटला, मिस्त्री सुधाकर, मूलबुरी भास्कर आदी राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व शेतकरी बांधव उपस्थित होते.