नकोडा वासियांचे आराध्य दैवत श्री श्री श्री राम जानकी मंदिरात होणार पथदिवे सह रोषणाई लवकरच जिल्हा परिषद शेष निधी अंतर्गत ३.५ लाख रुपयाची मंजुरी झाली नकोडा नागरिक श्री राम नामाच्या दैनंदिन होईल गजर

 

बल्लारपूर (राजू वानखेडे : तालुका प्रतिनिधि)

चंद्रपूर जिल्ह्यातील नकोडा ह्या गावातील नागरिकांचे आराध्य दैवत “प्रभू श्री राम” आहे. अनेको वर्षापासून येथील नागरिकांचे श्री.श्री.जानकी राम मंदिर देवस्थान सर्वांसाठी आराध्याचे स्थळ आहे. रामनवमी तसेच इतर कार्यक्रम मोठ्या उत्साहाने येथील नकोडावासी साजरा करतात. गावातील नागरिकांना नकोडा गावातून रात्री पथदिवे नसल्यामुळे श्री.श्री.राम जानकी देवस्थान येथे प्रभू रामचंद्र यांच्या दर्शणासाठी जाण्यास अरथळा निर्माण होत होता. चंद्राच्या उजेळात देवस्थानी वाट धरीत भक्त श्री.प्रभू रामचंद्राच्या दर्शनाला जात होते. हे बघून गावातील सरपंच श्री.किरण बांदुरकर, उपसरपंच मंगेश राजगडकर व पं.स सदस्य सौ. सविताताई ऋषी कोवे, ऋषी कोवे व ग्रा.प सदस्य गावातील नागरिक यांनी माजी समाजकल्याण सभापती तथा तत्कालीन जि .प सदस्य श्री.ब्रिजभूषण पाझारे यांच्या कडे नकोडा वस्तीपासून तर श्री.राम जानकी मंदिर देवस्थानापर्येंत रोषणाई नसल्याची खंत व्यक्त केली. त्यार्थी तत्काळ ब्रिजभूषण पाझारे यांनी मा.आ.सुधीरभाऊ मूनगंटीवार माजी अर्थनियोजन मंत्री यांच्या मार्गदर्शनातून चंद्रपूर जिल्हापरिषदेला मागणी केली असता जिल्हा परिषदेच्या शेष फंडातून ३ लाख ५० हजार रुपये मंदिराच्या रोषणाई व साउंड सिस्टम करिता मंजूर करण्यात आलेली आहे.
सदर कामाचा श्रीगणेश झालेला असून लवकरच मंदिरातील परिसर रोशानाईत उजळणार असल्याबाबत येथील नागरिकांत उत्साह पाहण्यास मिळत आहे. यावर श्री श्री श्री जानकी राम मंदिर देवस्थान कमिटी चे पदाधिकारी रामलू बाबू, कंपय्या राजू, चंदर ताला,नागराज दासरपु, नर्रा राजन्ना, रमेश रास्पेल्ली, सुरज कुटला, अंजय्या गोनपेल्लीवार, महादेव वाघमारे, बालकृष्णा झाडे, कोला नर्सिंग, मेकाला चन्द्रःया, ग्रा.प सदस्य ग्रा.प सदस्य – अर्चना पाझारे, तनुश्री बांदुरकर, सुजाता गिड्डे, हेमा ताला, जसप्रीतसिंग कौर, प्रभाकर लीगमपेल्ली, कंपा राजय्या व नकोडा येथील नागरिकांनी आभार व्यक्त केले आहे.