ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट ,चंद्रपूर चा शैक्षणिक उपक्रम

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

“यिन व ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट ,चंद्रपूर” यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. निबंध स्पर्धेचा विषय “कोरोना काळात युवकांची सामाजिक बांधिलकी” हा होता. संपूर्ण महाराष्ट्रातून एकुण 282 निबंध आले होते. त्यात प्रामुख्याने ग्रामीण व शहरी भागातील विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त सहभाग घेतला. त्यातुन उत्कृष्ट असे 16 निबंध काढण्यात आले होते. यासाठी यिन चे पदाधिकारी खास करून जिल्हाध्यक्ष अनिकेत दुर्गे व त्यांचे युवा सहकारी, युवा परिक्षक गण यांच्या अथक परिश्रमाने निकाल जाहीर करण्यात आला. त्यात प्रथम क्रमांक अर्चना वाघमारे (पुणे), द्वितीय क्रमांक विनीत घरडे (अमरावती), तृतीय क्रमांक विशाल शेंडे (चंद्रपूर) यांना मिळाला. सर्व विजेत्यांचे ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट ,चंद्रपूर तर्फे मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले. विजेत्यांना रोख पारितोषिक व मोमेंटो देण्यात येत आहे. तसेच स्पर्धेत भाग घेतलेल्या स्पर्धकांना e certificate देण्यात येत आहे. ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट ,चंद्रपूर च्या अध्यक्ष माननीय अल्काताई मोटघरे यांनी विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले आहे व भविष्यात अशाच प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून विद्यार्थ्यांना अभ्यास, वाचनाची सवय, आधुनिक यंत्रणा, ज्ञान, आधुनिक आजच्या घडामोडी जास्तीत जास्त कळाव्यात यासाठी विद्यार्थ्यांनी प्रयत्नशील राहुन आपल्या ज्ञानात भर पाडावी अशा शुभेच्छा दिल्यात. यिन च्या संपूर्ण पदाधिकाऱ्यांच्या रात्रंदिवसाच्या मेहनतीचे कौतुक करावे तेवढे थोडेच. ब्ल्यु मिशन मल्टिपरपज पब्लिक ट्रस्ट, चंद्रपूर तर्फे त्यांचेही अभिनंदन करण्यात आले. आणि आभार मानन्यात आले आहे. ज्या विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत भाग घेतला त्यांचेही अभिनंदन करण्यात आले.आणि आभार मानन्यात आले. अशी माहिती प्रा. दुषंत नगराळे, प्रमुख मार्गदर्शक, ब्ल्यु मिशन चंद्रपूर यांनी दिली आहे.