माननिय नानाभाऊ पटोले यांचे वाढदिवसाच्या औचीत्याने वृक्षारोपण

 

बल्लारपूर ( राजू वानखेडे: तालुका प्रतिनिधि)

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. आ. नानाभाऊ पटोले यांचे वाढदिवसाच्या औचीत्याने महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष मा. श्री भानुदासजी माळी यांचे निर्देशानुसार चंद्रपुरात तुकुम येथील महापालिका शाळेच्या प्रांगणात वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)अध्यक्ष श्री प्रकाश देवतळे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अध्यक्ष श्री रितेश तिवारी, महानगर पालिका गटनेते तथा विरोधी पक्षनेते डॉ.सुरेश महाकुलकर, प्रदेश काँग्रेस ओबीसी विभागाचे सरचिटणीस उमाकांत धांडे, शहर जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाचे अध्यक्ष प्राचार्य नरेंद्र बोबडे,माजी नगरसेवक गोपाल अमृतकर, रवि भिसे,पप्पू सिद्दीकी,मनोज खांडेकर,विजय धोबे, संदीप सिडाम,सुनील वडस्कर, सुनंदा धोबे, संध्याताई पिंपळकर आदींची उपस्थिती होती.